पान:आरोग्यशास्त्र.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४२ आरोग्यशास्त्र फेसाळण्याची क्रिया न घडतां केलेली पेयें ह्यांमध्ये चहा, कॉफी, कोको, थंडाई, सरबतें इत्यादि पेयें येतात. चहा (टी) चहाच्या सुक्या पानांत आल्ब्युमिन, निष्कर्षित द्रव्यें (एक्स्ट्रॅक्टिव्ज्), डेक्स्ट्नि, खनिज नमकें आणि शेंकडा १३ भाग टॅनिक अॅसिड व शेंकडा तीन भाग थेइन नामक अल्कलॉइड हीं घटक द्रव्ये असतात. हिरव्या रंगाच्या चहांत टॅनिक अॅसिड व इथिरिअल तेलें अधिक असतात; व थेइन कमी असतें. कोवळी पानें सुकविल्याने चहा हिरवा दिसतो. जुनवान पानांचा चहा काळा दिसतो. दोन्ही प्रकारचा चहा एकाच झाडापासून पैदा होतो. आधणाच्या पाण्यांत पानें टाकून चहा तयार करितात. तो शिजवू नये. पानें घातल्याबरोबर भांडें चुलीवरून उतरून लगेच त्यावर झांकण घालावें. ३-४ मिनिटांनीं तो गाळून घ्यावा व त्यांत दूध घालावें. चहा बनत असतांना पानाचा शेंकडा २५ भाग पाण्यांत उतरतो. चहा बनण्यास सुरुवात होतांच पानांतील थेइन प्रथम पाण्यांत उतरतें. टॅनिक अॅसिड सावकाश उतरतें. चहा न गाळतां पांच मिनिटांपेक्षा जास्त वेळ ठेवल| तर फारच टॅनिक अॅसिड त्यांत येतें. त्याची चव कडसर व तुरट होते. टॅनिक अॅसिडने पचन बिघडतें व भूक मंद होते. चहा कर- ण्यास मृदु पाणी वापरल्यास चहाचीं पानें कमी पुरतात. कारण मृदु पाण्यांत पानांचा सत्त्वांश खेचून घेण्याचा धर्म अधिक असतो. चहा ह्या पेयांत डेक्स्ट्न्, ग्लूकोज, टॅनिन्, थेइन् व उडणारें तेल इत्यादि पदार्थ उतरतात. चहा जेवणाच्या जरा अगोदर किंवा जेवल्याबरोबर घेऊं नये. कारण त्यांतील टॅनिक अॅसिडमुळे अन्नांतील आल्ब्युमिन गोठतें व त्याच्या पचनास कांहीं अडथळा येतो.