पान:आरोग्यशास्त्र.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाणी फार आहे. कारण शीत ऋतूंत तें गोठत नाही व ग्रीष्म ऋतूंत तें कोंबट होत नाही. ह्या हौदाची किंवा विहिरीची रचना दृढ व मज- बूत असावी आणि अभेद्य सिमेंटनें (लेप ) ते आंतून मढविले पाहिजे. त्याचा पाया घन द्रव्यांनी भरून दृढ करावा व त्या हौदाचे चारी बाजूस चांगल्या तुडवलेल्या चिखलाचे सुमारे हातभर जाडीचे लिंपण द्यावें. पर्जन्यजलाचा स्वयंपाकाचे कामी व कपडे धुण्याचे कामी उपयोग होतो. ह्या जलाला मृदु ह्मणतात. कारण त्यांत चुन्याचे व मॅग्नेशिआचे क्षार नसतात. हे पाण्यात विरघळले तर त्यास काठिण्य येते. एक शेर पाण्यांत हे क्षार एका गुंजेहून अधिक असल्यास त्या पाण्यास कठिण जल म्हणतात. कॅर्बानिक असिड वायूमुळे द्रवीभूत झालेल्या खडूपासून ज्या पाण्यास काठिण्य येते त्यास अशाश्वत कठिण जल ह्मणतात. कारण उकळल्यामुळे त्यांतील वायु निघून जातो व खडूचा साखा भांड्याचे तळी बसून ते शुद्ध होते. अशा प्रकारे बसणाऱ्या खडूचे थराने भांडयाचे आंतील बजूवर खरीचा लेप बसतो. कठिण जलांत एकादा पदार्थ शिजविला तर जलां- तील काही भाग भांड्यावर चढतो व कांहीं शिजणाऱ्या पदार्थाचे भोंव- ताली व त्याचे रंध्रांत घुसून शिजण्याचे क्रियेस अडथळा येतो. त्या पदा- र्थाचे अंतर्भागी उष्णता बरोबर पोहचत नाही व त्या पदार्थाचे पाण्यांत बरोबर रीतीने द्रावण ( solution ) किंवा विलयन होत नाही. ही खर पात्राचे आंत चिकटल्याने जलांतील उष्णता वाया जाते. ह्या खरीतील क्षारामुळे इंजिनासाठी पाणी साठविण्याचे व उकळण्याचे बॉयलर कर- बडून जातात व वाफेने प्रचंड शक्तीने करवडलेल्या जागी एकदम छिद्र पडून ते पात्र फुटून अपघात व मनुष्यहानि होते. कठिण जल वापरल्यास साबू ज्यास्त खर्च होतो. कारण त्यांतील क्षार साबूशी मिसळून अविद्राव्य चिकटा उत्पन्न होतो व तो धुण्यास .