पान:आरोग्यशास्त्र.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्न, पेयें व मसाला १११ पैकीं शेवटली फार चांगली आहे. या कृतीनें मांस ताजें राहतें व त्यां- तील पौष्टिक धर्म कमी होत नाहीं. रोगट व क्षीण (Unsound ) मांसाचे दुष्परिणाम रोगग्रस्त जनावराचें मांस किंवा कुजकें मांस आंतील जंतु मारण्यासाठीं फार वेळ शिजलें तरी त्यापासून अपाय घडतो. यानें जंतु मरतात. विस्तवावर भाजण्यापेक्षां परतण्यानें व परतण्यापेक्षां शिजविल्यानें निर्जंतु- करण अधिक होतें. परंतु जंतूंपासून झालेलें विष बाधतें. वरवर शिज- विलेलें व आंतून कचें राहिलेले मांस खाण्यांत आल्यास विषारी भावना होतात व कधीं कधीं मृत्यु येतो. दूषित मांसाचे भक्षणापासून होणाऱ्या भावना सहा ते आठ तासांत उद्भवतात. अन्नमार्गाचा क्षोभ होतो. त्यामुळे वांत्या, रेच, मुरडा व पेटके येणें, हृदयाचें क्षीणत्व ह्या भावना होतात. कोथभवनांत उत्पन्न होणारे बॅक्टेरिआ अथवा विशिष्ट प्रकारच्या रोगांतील बॅसिली अथवा त्या जंतूची क्रिया आल्ब्युमिनयुक्त पदार्थावर झाल्याने होणारे टोमेन्स व आल्ब्युमोसिस नामक विषारी अल्कलाइन्स यांचेपासून विषारी भावना उत्पन्न होतात.. कोथभवना- पासून उत्पन्न होणाऱ्या पदार्थांपासून जेव्हां विषारी भावना होतात तेव्हां त्यांस टोमेन पॉइझनिंग म्हणतात. जनावरांचे कांहीं आजार मनुष्याला जडतात. जसें :- ऍथँक्स व मॅलि- झंट पश्चुल, ट्युबर्कल, फुट अँड मौथ डिसीज, रेबीज, घोडयाचे ग्लॅडर्स अँड फासी हे रोग, डुकराचा सिस्टिसर्कस सेल्युलोसी हे रोग व बैलाचा सिस्टिसर्कस बोविस व डुकराचा ट्रिनिआ स्पायरॅलिस इत्यादि. ह्यांपैकीं सिस्टिसर्कस व ट्रिक्लिआ ह्या आजारांशिवाय बाकीच्या आजारांचा फैलाव अन्नाव्यतिरिक्त अन्य मार्गांनींच बहुतेक वेळा होतो. परंतु, तोही अन्नद्वारां होऊं शकेल हें ध्यानांत ठेवावें. दूषित