पान:आरोग्यशास्त्र.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाणी . राहील अशा रीतीने ठेवतात. त्या पात्राचे लांबीरुंदीप्रमाणे सांठलेल्या पाण्याचे जितके इंच किंवा इंचाचे शतांश वर्गमूलाने निघतात तितके इंच व शतांश वृष्टि झाली असे मानण्याचा प्रघात आहे. हिंदुस्थानांतील निरनिराळ्या भागांत पर्जन्याची वृष्टि भिन्न प्रमाणात होते. महाबळेश्वरी ३०० इंच, साताऱ्यास ३० इंच व मारवाडांत ५ इंच वृष्टि होते. निर्जल प्रदेशांत बरेंच लांबवर जमीन खणून तयार करून त्यांत पावसाचे पाणी साठविण्याची चाल आहे. असल्या साध्या तलावावर गुरें ढोरे जाण्याची व वस्त्रप्रावरणे किंवा भांडीकुंडी धुण्याची बंदी होण्या- साठी त्याभोवती तारांचे कुंपण असते. तलावाची जागा चारीभोवती उतरती करावी. किंवा ती उंचवट्यावर असल्यास एकाच दिशेने उत- रती होईल अशी खोदून तयार करावी व त्यांत येणारे पाणी नहराचे द्वारां कृत्रीम तलावांत सोडावे. असल्या तलावांची जमीन कापीव दगड इत्यादि पदार्थांनी बांधून काढावी म्हणजे जमिनीत पाणी निचरून जाणार नाही. एका स्केअर यार्ड जमिनीवर एक इंच पावसाने ४.६७३ गॅलन ( गॅलन = ५ शेर) पाणी साचतें व एक एकर जमिनीत २२६,१७ गॅलन पाणी साठते. एका सालांत पावसाची सरासरी माहीत असल्यास त्यावरून घराचे छावणीवर पडलेले पाणी त्या सालांत किती गोळा करितां येईल त्याचा आदमास काढता येईल. परंतु बाष्पीभव- नाने शेकडा २० भाग पाणी कवलांच्या किंवा इतर छावणीतून उडून जातें तें वजा घालावे लागेल. मेघांतून बाहेर पडण्याचे समयीं जल फार शुद्ध व एकाकी असते; त्यांत अन्य बाह्य पदाथांची भेसळ नसते. हवेतून जमिनीवर पडेपर्यंत वातावरणांतील वायूंची व इतर वायुरूप व तरंगणारे पदार्थांची त्यांत मिसळ होते. नगरांचे प्रदेशांत पतन पावणाऱ्या जलामध्ये सल्फ्यूरस व सल्फ्यूरिक अॅसिड ह्यांची मिसळ झालेली पाहण्यात येते. शहरांत %