Jump to content

पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुध्दा त्याला शक्य होत नाही. उच्च शिक्षणाची कळ सोसून करायचे ठरविले, तरी या विद्यार्थ्यांना घरून साथ मिळत नाही. शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले की गंगेत घोडे न्हाले. डोक्यावरून पाणी फिरले असे अल्पसमाधानी हे आहेत. शिक्षणाने दारिद्रयाचे चटके बसत नाही हे त्यांच्या अद्याप लक्षात आलेले नाही. आहे त्यात समाधान मानून ते स्वतःच्या आनंदात दंग असतात. वसतिगृह, आश्रमशाळा यातही त्यांना अधिक अनुकूल परिस्थिती व मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे, असे हे आदिवासींचे जगणे आणि त्यातच शिकणे चालू आहे. म्हणून शिकण्यातील अडचणींचा विचार आता केला पाहिजे.

९७