Jump to content

पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होते. १९३६ ते १९४२ या कालावधीत माळेगाव, शिरसगाव, बोरवट, जातेगाव येथेप्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी काम केले.

 १९४२ मध्ये पेठ धरमपूर भागातील दुष्काळ निवारण्याचे काम ठक्कर बाप्पांच्या प्रेरणेने कार्य केले. सरकारी नौकरा सोडली आणि यावेळी डांगसेवा मंडळाचे कार्यकर्ते झाले. १९५० पर्यंत ते कॉंग्रेसचे सेक्रेटरी होते. मान्यताप्राप्त स्वातंत्र्य. सैनिक होते. गुरुजींनी सर्वोदय योजना, जंगल कामगार सोसायची सारख्या संस्थांत जे कार्य केले, त्यांची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने १९७४ मध्ये दलित मित्र व १९८७ मध्ये आदिवासी सेवक पुरस्कार त्यांना बहाल केले. १९८४ पासून गुरुजी वनवासी कल्याण आश्रम कार्यात सहभागी झाले. महाराष्ट्र प्रांताचे ६ वर्षे उपाध्यक्ष व २००१ पासून महाराष्ट्र प्रांत बनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष म्हणून २ वर्षे त्यांनी काम केले.

 वनवासी कल्याण आश्रम ही भारतभर आदिवासींमध्ये संघर्षरहित काम करणारी सर्वस्पर्शी संस्था आहे, असे त्यांचे मत होते ते त्यांनी सर्वत्र मांडले आहे.

 तात्पर्य २० व्या शतकातील एक आदिवासी साहित्यिक, आदिवासी संशोधक, आदिवासी संस्कृतीचा जाणकार काळाच्या पडया आड केला. त्यांची उणिव कायम जाणवतच राहणार आहे. गुरुजींना महाराष्ट्र शासनाने दलितमित्र

(१९७४), आदिवासी सेवक (१९८७) या पुरस्काराने गौरविले, तसेच त्यांना पु. भा. भावे, नंदिनी, जीवनव्रती, बनयोगी, आणि डॉ. हेडगेवार सेवा पुरस्कार प्राप्त झाले. सुदैवाने हयातीत त्यांचा हा उचित पुरस्कारांनी गौरव झाला असला तरी गुरुजी हा स्वतःचा गौरव न मानता आदिवासींचा, असंख्य कार्यकर्त्यांचा प्रतिनिधीचा गौरव मानत होते.

१५६