पान:अभियांत्रिकी.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पूर्वतयारी : उपक्रमाची निवड :(१) एखाद्या कंपाऊंडसाठी ३मी. उंचीचेRcc कॉलम तयार करा.(२) शाळेचे काँक्रीटचे काम करा. (पायाभरणी, पायऱ्या तयार करणे.)(३) शेडसाठी ६ फूट व ८ फूट उंचीचे खांब तयार करा. निदेशकाने करावयाची पूर्वतयारी : (१) प्रात्यक्षिकासाठी लागणारे साहित्य एकत्र आणून ठेवणे. उदा. 8mm. टॉर्शन बार, ६ mm. बार, बायडींग तार, वाळू, खडी, सिमेंट आणि पाणी. (२) प्रात्यक्षिकासाठी पुरेशी साधने आहेत की नाहीत याची खात्री करून घ्या. (हॅक सॉ, वेल्डींग मशीन, मेजरींग टेप, पक्कड, थापी, खोरे, साचा, घमेले, बारदान, बादली इ.) शिक्षक कृतीः(१)लाकडी फळ्यांचा बॉक्स तयार करायला शिकवणे. (२) काँक्रीट तयार करण्याचे प्रमाण सांगणे. अपेक्षित कौशल्ये : (१) साहित्याची/साधनांची हाताळणी करता येणे. (२) मापन करता येणे, (३) टॉर्शन बार कट करता येणे/तोडता येणे. (४) ६ mm. बार वाकविता येणे.. (५) सांगाडा (कॉलम) तयार / बांधता येणे. (६) फळ्या कापणे व लाकडी बॉक्स तयार करणे. (७) काँक्रीटचे प्रमाण माहीत असणे, (८) काँक्रीट तयार करता येणे, (९) काँक्रीट ओतणे / साच्यामध्ये भरता येणे. (१०) क्युअरिंग ज्ञान असणे. (११) क्युअरिंग करणे. सिमेंट : सिमेंट हे कॅल्शिअम, अॅल्युमिनिअम, मॅग्नेशिअम व सिलिकॉन या मूलद्रव्यांपासून ऑक्सिजन व हायड्रोजनशी संयोग पावून बनवलेले असते. यातील कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, अॅल्युमिनिअम व सिलिकॉन यांची ऑक्साईड निसर्गात सर्वत्र पसरलेली असतात. यांचे मिश्रण एकत्र करून भट्टीमध्ये चांगले तापवितात. त्यावेळी त्यात असलेले पाणी निघून जाते व ते वितळण्याच्या स्थितीमध्ये येते. अशा वेळी याचा संयोग होतो. थंड केल्यानंतर त्या मिश्रणाची बारीक भुकटी करतात. त्यालाच पोर्टलँड सिमेंट म्हणतात. त्याची जेव्हा पाण्याशी प्रक्रिया होते, त्यावेळी त्याच्या वेगवेगळ्या रेणुंचे पाण्याद्वारे बंध (Bond) जोडले जातात. या रासायनिक बंधांमुळे (Chemical Bonds) सिमेंटला मजबुती येते, पण सिमेंट नेहमी दुसऱ्या वस्तू जोडण्यास वापरतात. सिमेंटमध्ये रेती व खडी यांचे मिश्रण केल्यानंतर काँक्रीट बनते. त्यात सिमेंटचे प्रमाण अगदी कमी असूनही सिमेंटचे बंध जोडल्यामुळे सगळे काँक्रीट दगडासारखे घट्ट होते. एकदा घट्ट झालेले सिमेंट पुन्हा पाणी घालून वापरल्यास त्यास मजबुती येत नाही. म्हणून हवेतील आर्द्रतेने सिमेंट घट्ट होऊ नये, अशी काळजी घ्यावी. यासाठी सिमेंट वापरण्यापूर्वी कोरड्या जागेत जमिनीपासून उंचावर (जमिनीतील ओलाव्यापासून दूर) साठवले पाहिजे. मॉर्टर व काँक्रीट : सिमेंटने आपल्या दगडाचे वेगवेगळे कण एकत्र करून जोडायचे असतात. असे करताना या मिश्रणातील पोकळी सिमेंटने भरून काढायची असते. सिमेंटचा खर्च कमी यावा म्हणून वेगवेगळ्या आकाराचे कण (वाळू, खडी) एकत्र करतात. सिमेंट, वाळू यांच्या मिश्रणास मॉर्टर म्हणतात. सिमेंट, वाळू व खडी यांच्या मिळणास काँक्रीट म्हणतात. काँक्रीटमध्ये दगड एकमेकांना जोडलेले असल्यामुळे ते अगदी मजबूत बनते. गुणधर्म: (१) एकदा रासायनिक प्रक्रिया होऊन सिमेंट घट्ट झाल्यावर ते पाण्यात टिकून राहते. (२) सिमेंट सर्वसाधारण वातावरणात गंजत नाही किंवा सडत नाही, (३) सिमेंट काँक्रीट दाबामध्ये मजबूत असते, परंतु ताणामध्ये कमजोर असते, म्हणून काँक्रीट वापरताना ज्या भागामध्ये ताण येईल, तेथे लोखंडी सांगाडे घालावेत. त्यालाRCC (रिएन्फोर्स सिमेंट काँक्रीट) म्हणतात. (४) सिमेंट काँक्रीटवर साध्या उष्णतेचा परिणाम होत नाही वा ते जळत नाही, पण अगदी मोठ्या आगीला फुटते. (५) सिमेंट हे विजेचे किंवा उष्णतेचे चांगले वाहक नाही. (सिमेंट विजेचे दुर्वाहक आहे.) (६) सिमेंट मॉर्टरमध्ये पाण्याचा अंश जास्त असल्यास क्युअरिंग झाल्यावर तेथे पोकळी तयार होते व सिमेंट कमजोर होते.