Jump to content

पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांनाही स्वातंत्र्याची तहान आहे. आवश्यक तर त्या स्वतः उभ्या राहून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करू शकतात. हिंदुत्ववाद्यांच्या अभिनिवेशामुळे त्यांच्या मार्गात अडचणीच काय त्या उभ्या राहतात.
 विक्रमादित्याच्या राजधानीच्या जागी ससा लागे लांडग्यापाठी हा चमत्कार घडला, तोच चमत्कार लाहोर विद्यापीठाच्या आवारातही घडतो आहे.

दि. १६/५/२०००
■ ■

अन्वयार्थ – दोन / ४३