Jump to content

पान:अकबर १९०८.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.

२७

 सल्हाणानें धिःकारयुक्त स्वरानें उत्तर केलें, ' तूं अजून पोर आहेस. - तुला माहित असलें पाहिजे की, ज्याचा सृष्टिविषयक गोष्टींविषयीं अनुभव. जास्त आणि जो संसारिक गोष्टींशीं विशेष परिचित आहे असा माझ्या बयाचा पुरुष धर्म काय आणि अधर्म काय हें चांगलें. जाणत असला पाहिजे. अजून तुझें बाळपण गेलें नसल्यामुळे असल्या विषयांत आह्मां- सारख्यांस सल्ला मसलत देण्यास तूं योग्य नाहींस.,
 सिद्धराम —–आर्य, मला क्षमा असावी. आपणांस ठाऊकच आहे कीं, मला राजकीय विषयांत फारच थोडें समजतें. अतएव त्या विषयांत मी आपली अनुमती प्रकट करणें निःसंदेह चुकीचें होईल. परंतु, माझ्या गुरू शिक्षण देतांना मला सांगितलें आहे कीं, जो विषय सत्य आणि
 सल्हाणानें मध्येच ह्यटलें “ होय, ठीक आहे. तुझा गुरू कुल्लुक हा माझा परम मित्र आहे. मी त्याला अंतःकरणपूर्वक मान देतों.. परंतु, तो केवळ शास्त्रज्ञाता आहे, व्यवहारज्ञ नव्हे. त्याला मानसिक कल्पनांचे उत्तम. प्रकारचें ज्ञान आहे. परंतु व्यवहाराचें नाहीं. पहा, सांप्रत तुझांला अत्यंत प्रिय असलेल्या तुमच्या देशावर आणि देशवासी जनांवर एका विदेशी आणि विधर्मी राजाचें आक्रमण होण्याचा संभव आहे- तूं हरप्रकारें मनापासून त्याची सेवा कर. परंतु, या एका विषयासंबंधानें मात्र पक्की सावधगिरी ठेक या संबंधांत बादशहाचे हेतु होईल. तितकें करून निष्फळ करणें हेंच तुझें अत्यंत श्लाघ्य असें कर्तव्यकर्म आहे. आजव तसा प्रसंग आला आहे. असें नाहीं, तथापि अंशतः तरी आला आहे हें खास केवळ एका साधारण राजनैतिक मानमर्यादेच्या हेतुस्तव हाती आलेली अशी अमुल्यः संधी व्यर्थ जाऊं देणें हें तुजसारख्याला कदापि उचित व्हावयाचें नाहीं.. तूंच पहा कीं, तुला अथवा आह्मांला आपल्या नौकरीस ठेऊन आमच्या-- देशावर चाल करण्याचा विचार बादशहाचे मनांत घोळत आहे तो कितपत धर्माला अनुसरून आहे ? झाले तर, अशा स्थितीत त्यानें तरी आह्मांकड्न न्यायपूर्वक राजभक्तीची आशा कां करावी ? एवंच जें आहे तें ठीक आहे. माझें झणणें तुला खरें वाटत नसेल आणि तुझ्या अंगी