Jump to content

पान:अकबर.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ३ रा.

१५


 परंतु, हिंदुस्थानास लुब्ध होऊन त्यावर स्वारी करून फत्ते मिळवि- लेल्या इतर योद्धयांप्रमाणे, बाबर यासही प्रथमतः कंदाहार आपले काबूंत पूर्णपर्णे करून घेणें अतिशय अगत्याचें वाटलें. सवत्र स्वदेशांत दंगेधोपे उद्भवल्यामुळे त्याला स्वारीस निघण्यास बरीच दिनावधि लागली, पुढें तेथें शांतता झाल्यावर स्वदेशाच्या बाहेरील इतर गोष्टींनीं त्याचें मन वेधिलें. त्याचा पुरातन शत्रु शैत्रानी हा पुनः समरकंदावर राज्य करीत होता व त्याने लहान सान प्रांत जिंकून बल्ख यास वेढा घातला होता. ही त्याची चढती पाहून, हिरातचा राजा सुलतान हुसेन मिरझा हा घाबरला व स्वारी करणाऱ्या शैबानीवर हल्ला करण्यास मदत मागण्याकरितां त्यानें लगबगीनें बाबराकडे जासूद पाठविला. बाब- रार्ने त्याची विनंति विलंब न लावतां मान्य केली व तो जून १९०६ मध्ये, काबुलाहून निघाला, तो थेट काहमर्ड एथे दाखल झाला ; व तेथें तळ देऊन, दाणागोटा व इतर सामुग्री गोळा करून पुढील स्वारीची तयारी करूं लागला. तो या कार्मी गुंतला असतां, जासुदानें सुलतान हुसेन मिरझा मरण पावल्याची खबर आणिली. ती ऐकतांच बावर स्वरेनें पुढे सरसावला व ८०० मैल चालून जाऊन मुरघाब नदीवर मय्यत झालेल्या सुलतानाच्या मुलांस व त्यांचे सैन्यांस जाऊन मिळाला.
 सुलतान हुसेन मिरझा याचे गादीवर त्याच्या मुलांपैकी दोघेजण चसून समायिकीर्ने राज्य करूं लागले होते. हीं मुलें दिसण्यां सुरेख ; शिकलीं सवरलेलीं, चालचलणुर्कांत चांगली व बुद्धिमान् अशीं होती; पण तीं नामर्द व ख्यालीखुशालीत गर्क असल्यामुळें, साध्या व लढाऊ शैवानीबरोबर सामना करण्यास अगदीं अयोग्य आहेत असें बाबर यास तेव्हांच दिसून आलें. ते आपले गोटांत चैन मारीत असतां, शैबानी यार्ने बल्ख काबीज करून घेतलें. नंतर थोडेंसें खलबत करून या उभयतां सामायिक राजांनी ठरविलें कीं आपले सैन्यास तूर्त फांटा द्यावा व वसंत ऋतूंत पुनः लढाई सुरू