एकनाथी भागवत

विकिस्रोत कडून

एकनाथी भागवत हा एकनाथांचा एक महत्त्वाचा ग्रंथ असून वारकरीपंथास आधारभूत आहे. संस्कृतमधील भागवत पुराणाच्या एकादश स्कंधावरील ही ओवीबद्ध मराठी टीका आहे. त्याची रचना इ.स. १५७० ते इ.स. १५७३ या काळात झाली. सत्ताविसाव्या अध्यायात पूजाविधी आहे. सर्वांभूती समानता आणि भगवद्‌भाव हे नाथांच्या शिकवणीचे सार म्हणून सांगता येईल. भक्तीच्या द्वारे परमार्थाची प्राप्ती करून घेण्याच सुलभ मार्ग प्रापंचिकांपुढे ठेवणे, हे या ग्रंथाचे प्रयोजन होते. आपल्या गुरूच्या आदेशावरून या ग्रंथाची रचना केल्याचे एकनाथ सांगतात. पैठण येथे असताना त्यांनी पाच अध्याय लिहिले. एकनाथांच्या एका चाहत्याने काशीस जाताना ते पाच अध्याय सोबत नेले. भागवत ग्रंथाचा हा प्राकृत अवतार पाहून काशीक्षेत्रात विद्वानांना क्रोध आला आणि त्यांनी एकनाथांना काशीस बोलावून घेतले. तेथे त्यांनी काशीच्या मणिकर्णिका घाटावर संपूर्ण भागवताची रचना केली आणि ती विद्वज्‍जनांपुढे मांडली. तेथे हा ग्रंथ विद्वज्जनांच्या पसंतीस उतरला आणि त्या ग्रंथाची त्याच विद्वज्जनांनी काशी मध्ये मिरवणूक काढली.

  1. एकनाथी भागवत/अध्याय पहिला
  2. एकनाथी भागवत/अध्याय दुसरा
  3. एकनाथी भागवत/अध्याय तिसरा
  4. एकनाथी भागवत/अध्याय चौथा
  5. एकनाथी भागवत/अध्याय पांचवा
  6. एकनाथी भागवत/अध्याय सहावा
  7. एकनाथी भागवत/अध्याय सातवा
  8. एकनाथी भागवत/अध्याय आठवा
  9. एकनाथी भागवत/अध्याय नववा
  10. एकनाथी भागवत/अध्याय दहावा
  11. एकनाथी भागवत/अध्याय अकरावा
  12. एकनाथी भागवत/अध्याय बारावा
  13. एकनाथी भागवत/अध्याय तेरावा
  14. एकनाथी भागवत/अध्याय चौदावा
  15. एकनाथी भागवत/अध्याय पंधरावा
  16. एकनाथी भागवत/अध्याय सोळावा
  17. एकनाथी भागवत/अध्याय सतरावा
  18. एकनाथी भागवत/अध्याय अठरावा
  19. एकनाथी भागवत/अध्याय एकोणीसावा
  20. एकनाथी भागवत/अध्याय विसावा
  21. एकनाथी भागवत/अध्याय एकविसावा
  22. एकनाथी भागवत/अध्याय बाविसावा
  23. एकनाथी भागवत/अध्याय तेविसावा
  24. एकनाथी भागवत/अध्याय चोविसावा
  25. एकनाथी भागवत/अध्याय पंचविसावा
  26. एकनाथी भागवत/अध्याय सव्विसावा
  27. एकनाथी भागवत/अध्याय सत्ताविसावा
  28. एकनाथी भागवत/अध्याय अठ्ठाविसावा
  29. एकनाथी भागवत/अध्याय एकोणतिसावा
  30. एकनाथी भागवत/अध्याय तिसावा
  31. एकनाथी भागवत/अध्याय एकतिसावा
  32. एकनाथी भागवत/समारोप


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[वर्ग:‎]]