होरा राशिप्रभेदध्याय:

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

तत्रौदे । सुर्यग्रहनक्षत्रराशि कल्पनमाह -

श्लोक १) तमसावृत्ते‍ समन्ताज्ज्‍तेभूतले ततोकस्मात्

      उदितो भगवान् भानु: प्रकाशयन् स्वप्रकाशेन ।।।।

श्लोक २) व्यसृजज्ज्गत्समस्तं ग्रहर्क्षसंघातकल्पितावगतम्

       द्वादशभेदैश्चित्र: काल: संप्रस्तुतस्तस्मात् ।।।।

भावार्थ

१)  जेव्हा भुतलावर चहु बाजूला अंधकार होता व जलमय   होते तेव्हा भगवान सुर्य नारायण हे स्वप्रकाशित    होवून अंध:काराचा नाश करण्यासाठी प्रगट झाले.

२) यानंतर नक्षत्रादि समुहांनी कल्पना केलेल्या   अवयवरुपी समस्त जगताची रचना झाली व    दवादश    भेद गणनेचे विचित्र कालाची रचना झाली.

संज्ञा

श्लोक ३) मेषवृ़मिथुनकर्कटसिंहा: कन्या तुलाथ वृश्चिक:

       धन्वी मकर: कुम्भो मीनस्त्विति राशिनामानि ।।२।।

    ४) कुम्भ: कुम्भधरो नरोथ मिथुनं वीणागदाभ्रन्नरो

       मीनौ मीनयुगं धनुश्च सधनु: पश्चाच्छरीरो हय:

       एणास्यो मकर: प्रदीपसहिता कन्या च नौसंस्थिता शेषो राशिगण: स्वनामसदृशो धत्ते तुलाभृत्तुलाम्।।४।।

भावार्थ 3) मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन हे क्रमश: राशिंचे नाव आहेत.

     ४) ज्याप्रमाणे, कुंभ राशि म्हणजे खांद्यावर घडा घेवून  उभा असलेल्या पुरुषा प्रमाणे मिथुन गदा सहित पुरुष  व विणे स्त्री परस्परांकडे चेहरे असण्याच्या मुद्रेत  परस्परांच्या शेवटीकडे तोंड करुन असलेले मत्स्य  मीन राशि सदृश.

धनु राशि धनुष्य धारी अश्व व पुरुष सदृश.

   कन्या नौकेवर स्थित हातामध्ये आग घेवून असलेल्या कुमारी प्रमाणे, तुळ रास हातामध्ये तराजु घेवून उभ्या असलेल्या माणसाप्रमाणे व उरलेल्या मेष, वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर आपल्या नावाप्रमाणे मुर्त आहेत.

श्लोक ५) शीर्षास्यबाहुहृदयं जठरं कटिवस्तिमेहनोरुयुगम्

        जानू जंघे चरणौ कालस्यांगानि राशयोजाद्या: ।।५।।

श्लोक ६) कालनरस्यावयावान्पुरुषाणां कल्पयेत्प्रसवकाले

        सदसद्ग्रहसंयोगात्पुष्टान्सोपद्रवांश्चापि ।।६।।

भावार्थ ५) मेषादी राशि कालपुरुषाच्या क्रमाने डोके आदि अवयव  हे लोक व्यवहारासाठी कल्पना केलेले आहेत.

उदा.

मेष – शिर्ष

वृषभ – मुख

मिथुन – बाहु

कर्क – हृदय

सिंह – उदर

कन्या - कंबर

तुळ – नाभी/अंतर्भाग

वृश्चिक – लिंग

धनु – पार्श्वभाग

मकर – जानु (दोन्ही)

कुंभ – जंघा (दोन्ही)

मीन – पाय (दोन्ही)

याचे प्रयोजन असे की जन्म समयी जो अवयव पाप गहाने युक्त वा दृष्ट तो विकारयुक्त, व जो अवयव शुभ ग्रहाने दृष्ट वा युक्त तो पुष्ट् म्हणाला गेला पाहिजे.

उदा . जर मेषेत पापग्रह तर शिर्ष विकृती व शुभ ग्रह दृष्ट व युक्त् असता शिर्ष पुष्ट व सुंदर मानले गेले पाहिजे.

श्लोक ७)  मेघादिनां क्रियतावुरुजुतुमकुलीरलेयपाथोना:

        संज्ञास्तु जूककौर्पिकतौक्षाकोकेरहृदयरोगान्त्या:।।७।।

श्लोक ८) ऋक्षं भवननामानि राशि: क्षेत्रं भमेव वा

        उत्कानि पूर्वमुनिभिस्तुल्यार्थप्रतिपत्तये।।८।।

मेषादी राशिंना पुढील क्रमाने पर्यायवाचक शब्द आहेत

मेष

वृषभ

मिथुन

कर्क

सिंह

कन्या

तुळ

वृश्चिक

धनु

मकर

कुंभ

मीन

क्रिय

ताबुरु

जुतुम

कुलर

लेय

पाथोन

जुक

कौर्पिक

तौक्ष

आकोकेर

हृद्रोग

अन्त्य

याशिवाय राशिंच्या परिभाषा भवन, ऋक्ष, राशि क्षेत्र, व प्राचीन मुनींच्या तुलनात्मक अर्थासाठी कल्पना केलेली आहे.

श्लोक ९)  द्वादशमण्डलभगणं तस्यार्धे सिंहतो रविर्नाथ:

        कर्कटकात्प्रतिलोमं शशी तथान्येपि तत्स्थानात्।।।।

श्लोक १०) भनोरर्धे विहगै: शूरास्तेजस्विनश्च् साहसिका:

शशिनो मृदव: सौम्या: सौभाग्ययुता: प्रजायन्ते ।।१०।।

भावार्थ :- बारा राशि मिळून एक भगण होते. यामध्ये सिंह आदि       ६ राशि रवि व कर्क पासुन पुढे ६ राशिंचा स्वामी चंद्र         आहे शिवाय त्या दोहोंपासून स्थानानुरुप इतर ग्रह          देखील स्वामी म्हणून गणले जातात.

उदा.     सिंह रवि

        कन्या बुध

        कर्क चंद्र

आता पुढीलप्रमाणे श्लोकांमध्ये आपण बारा राशि स्वामींचे चाल घेवू या.

श्लोक ११) कुजभृगुबुधेन्दुरविशशिसुतसितरुधिरार्यमन्दर्शनिजीवा:

        गृहपा नवभागानामजमृगघटकर्कटाद्याश्च ।।११।।

श्लोक १२) भवनाधिपै: समस्तं जातकविहितं विचिन्तयेन्म्‍तिमान्

        एभिर्विना न शक्यं पदमपि गन्तुं महाशास्त्रे ।।१२।।

राशि

मेष

वृषभ

मिथुन

कर्क

सिंह

कन्या

तुळ

वृश्चिक

धनु

मकर

कुंभ

मीन

स्थायी

मंगळ

शुक्र

बुध

चंद्र

रवि

बुध

शुध्‍क्र

मंगळ

गुरु

शनि

शनि

गुरु

या राशींमध्ये क्रमश: नवांश पुढीलप्रमाणे

राशि

मेष/सिंह/धनु

वृषभ/कन्या/मकर

मिथुन/तुळ/कुंभ

कर्क/वृश्चिक/मीन

नवांग प्रारंभ

मेष

मकर

तुळ

कर्क

श्लोक १३) वर्गोत्तम नवांशास्तथादिमध्यान्तगाश्चरा देषु

        सुतौ कुलमुख्यकरा द्वादशभागा: स्वराश्याद्या:।।१३।।

श्लोक १४) स्वर्क्षसिुतनवमभेशा द्रेक्काणनां क्रमाच्च होराणाम्

        रविचन्द्राविन्‍दुरवी विषमसमेष्वर्धराशीनाम् ।।१४।।

भावार्थ १३) चार राशिंमध्ये प्रथम नवांश (मेष/कर्क/तुळ/मकर)

        स्थिर राशीमध्ये पंचम नवांश     (मिथुन/सिंह/वृश्चिक/कुंभ)

        दवीरथभाव राशिंमध्ये नवम नवांश                     (मिथुन/कन्या/धनु/मीन)

   जर जन्म समयी जातक वर्गोत्त्म नवांशात जन्मला असेल तर तो आपल्या कुळाचा प्रधान असतो.

१४) प्रत्येक राशिच्या द्वाशांश स्वराशिपासून प्रारंभ होतो.

राशिचा तिसरा भाग १० त्याला द्रेष्काण म्हणतात. ज्या द्रष्काणाचा आपण विचार करतो जर तो प्रथम १० असेल तर त्याच राशिं स्वामीचा, दुसरा द्रेष्काण पाचव्या राशि स्थायी व तिसरा द्रेषकाण नवव्या राशि स्वामीचा असतो.

   राश्यार्धाला होरा म्हणतात. विषम राशिमध्ये १५ पर्यंत सुर्याचा होरा नंतर चंद्राचा होरा व सम राशिंमध्ये १५ पर्यंत चंद्राचा व पुढे १५ सुर्याचा होरा मानला जातो.

श्लोक १५) शरपश्चाष्टमुनीन्द्रियभागास्त्रिंशांशकास्तु विषमेषु

        युग्मेषूत्क्रमगण्या: कुजार्किजीवज्ञशुक्राणाम् ।।१५।।

भावार्थ :- त्रिशांशासाठी खालील तक्ता महत्वपूर्ण आहे.

        विषम रास ज्यामध्ये ग्रह अंशरुपि त्रिशांश विषद करतो.

विषम रास अंश (३० रास परत्वे)
अंश
स्वामी मंगळ शनि गुरु बुध शुक्र
सम रास अंश
स्वामी शुक्र बुध गुरु शनि मंगळ

याप्रमाणे सम राशीत त्रिशांशाधिपती आहेत.

-: समाप्त् :-