सुर्यसिध्दांत – (मध्यमाधीकार:)

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

सुर्यसिध्दांत – (मध्यमाधीकार:)

कालभेद-श्लोक (१०) - लोकानामन्तक़त काल: कालोऽन्य्: कलनात्मक:॥

स दिव्धा स्थूलसूक्ष्मत्वान्मूर्तश्चामूर्त उच्यते ॥१०॥

भावार्थ :- काल हा दोन प्रकारचा असतो. व गणनात्मक काळाता देखिल दोन भाग आहेत.

                    काल 

      संहारक काल           गणनात्मक काल 

                मुर्त                 अमुर्त

                 (व्यवहारिक)             (अव्यवहारिक)

श्लोक :- प्राणादि: कथितो मूर्तस्त्रुट्याद्योमूर्तसंज्ञक:

       षड्भि: प्राणैर्विनाडीस्यात्तत्षष्टया नाडिका स्मृता११

नाडीषष्टया तु नाक्षत्रमहोरात्रं प्रकीर्तितम्तत् त्रिंशता भवेन्मास: सावनोर्कोदयैस्त्‍था ॥१२॥

भावार्थ :- काल – प्राण आदी मुर्त व त्रुटी आदी अमुर्त संज्ञक सांगितले गेले आहेत.

१० दिर्धाक्ष्‍र उच्चरण काल – १ प्राण – १० विपळे.

६ प्राण – ६० विपळे – १ पळ.

६० पळ – १ नाडी

६० नाडी – १ अहोरात्र (नाक्षत्र)

३० अहोरात्र – १ मास

सौर चांद्रमास निरूपणम

श्लोक :- ऐन्दवस्तिथिभिस्तव्दत संक्रान्त्या सौर उच्यते। मासैर्व्दादशभिर्वर्षं दिव्यं तदह उच्यते ॥१३॥

भावार्थ :- तिस तिथींचा १ चांद्रमास, एक संक्रात ते दुसरी संक्रांत (जोपर्यंत सुर्य एका राशीत रहातो) त्यांना सौर मास म्हणतात. बारा सौर मासांचे एक सौर वर्ष होते. आणि याच सौर वर्षाला १ दिव्य दिन असेही म्हणतात.

   शिवाय एका सुर्योदया पासून पुढच्या सुर्योदया पर्यंतच्या वेळेला सावन दिन म्हणतात. ३०  सावन दिनांचा एक सावन मास व १२ सावन मासांचा १ सावन वर्ष होतो. शिवाय १२ चांद्र मासांचे एक चांद्र वर्ष होते.

   पण काल नियमनासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये वर्ष गणना सौर वर्षामध्ये होते. मास गणना चांद्र मासामध्ये व दिन गणना सावन दिनामध्ये होते.

श्लोक :- सुरासुराणामन्योन्यमहोरात्रं विपर्ययात । तत्षष्टि: षड्गुणा दिव्यं वर्षमासुरमेव च ॥१४॥

॥ सुरासुराणां दिन:रात्री व्य्वस्था ॥

भावार्थ :- देव आणि राक्षसांचे दिन/रात्र एकमेंकापासुन विपरीत क्रमाने होतात. जेव्हा देवांचा दिन तेंव्हा राक्षसांची रात्र व जेव्हा राक्षसांचा दिन तेव्हा देवांची रात्र होते.

   सहाने गुणून जर ६० अहोरात्र घेतले. अर्थात ६ x ६ = ३६० सौर वर्ष यांचा एक दिव्य वर्ष होते.

श्लोक :- तदव्दादश्ससहस्त्राणि चतुर्युगमुदाह्रतमसूर्याब्दसड्रख्सया व्दित्रिसागरैरयुताहतै:१५

        सन्ध्यासन्ध्यंशसहितं विज्ञेयं तच्चतुर्युगमक़तादीनां व्यवस्थेयं धर्मपादव्यवस्थाया१६

महायुगप्रमाणम

   देव व असुरांचे वर्ष प्रमाण १२००० दिव्य वर्षाचे एक चतुर्युग (महायुग) होते. सौर मासापासुन १०००० ने गुणले असतात ४३२ x १०००० = ४३२०००० वर्षे एक महायुग असतो.

   या वर्षामध्ये प्रत्येक युगाचा संधीकात घेतले असतात.

युग दिव्य्‍ वर्ष
सत्य्‍युग १२०० x ४ = ४८०० दि.व.
त्रेतायुग १२०० x ३ = ३६०० दि.व.
दवापारयुग १२०० x २ = २४०० दि.व.
कलियुग १२०० वर्षे.

३६० सावन दिन = १ वर्ष = १ दिव्य दिन.

३६० दिव्य दिन = १ दिव्य वर्ष

१२०० दिव्य वर्ष = महायुग

१२००० = ४३२०००० सौरवर्ष ॥१६॥

श्लोक :- युगस्य दश्‍मो भागश्चतुस्त्रिव्देकसंगुण: ।   क्रमात क़तयुगादीनां षष्ठांश: सुन्ध्ययो: स्वक: ॥१७॥

भावार्थ :- महायुगमान १२००० वर्षे यांचा जर एक दशांश घेतला व त्याला क्रमाने ४/३/२/१ ने गुणले असता सत्य/त्रेता/दवापार/कली युगाचे दिव्य वर्ष मास येतात.

   आपापल्या युगमानाचा १/६ बरोबरीच्या या युगांच्या दोन संधी होतात. म्हणून – चतुर्युग (महायुग) = १२००० दिव्य वर्ष

१२०० x १/१० = १२०० – महायुग १/१० भाग.

१२०० x ४ = ४८०० x ३६० = १७२८००० वर्ष - सत्य्‍युग
१२०० x ३ = ३६०० x ३६० = १२९६००० वर्ष - त्रेतायुग
१२०० x २ = २४०० x ३६० = ८६४००० वर्ष - दवापारयुग
१२०० x१ = १२०० x ३६० = ४३२००० वर्ष - कलीयुग

संधी :-

सत्ययुग :- ४८०० x १/६ = ८०० दि.व.संधी. (४०० प्रथम+४०० व्दितीय संधी)

त्रेतायुग :- ३६०० x १/६ = ६०० दि.व. संधी. (३०० + ३००)

दवापारयुग :- २४०० x १/६ = ४०० दि.व. संधी. (२०० + २००)

कलीयुग :- १२०० x १/६ = २०० दि.व. संधी. (१०० + १००)

संधीरहीत युगमान :-

४८०० – ८०० = ४०००     सत्ययुग :- १४४००००

३६०० – ६०० = ३०००     त्रेतायुग :- १०१८०००

२४०० – ४०० = २०००     दवापारयुग :- ७२००००

१२०० – २०० = १०००     कलीयुग :- ३६००००

श्लोक :- युगानां सप्तति: सैका मन्वन्तरमिहोच्यते । क़ताब्दसड.ख्यस्तस्यान्ते सन्धि: प्रोक्तो जलप्लव:   ॥१८॥

ससंधीमनुप्रमाणम

मुर्त वा व्यवहारीक कालप्रमाणामधे ७१ महायुगे (चतुर्युग) यालाच एक मन्वंतर म्हटंले आहे. आणि प्रत्येक संधीत ४८०० वर्ष. वा एक सत्ययुगांचा बरोबरीचा संधी काल असतो. म्हणजेच प्रत्येक मन्वंतरानंतर प़थ्वीवर ४८०० वर्ष जल प्लावन असते.

श्लोक :- ससन्धयस्ते मनव: कल्पे ज्ञेयाश्चतुर्दश। क़तप्रमाण: कल्पादौ सन्धि: पञचदश: स्म्‍त: ॥१९॥

कल्प्‍प्रमाणम

   एका कल्पात संधी सहीत १४ मनु असतात. आणि कल्पाच्या आधी सत्ययुगाच्या बरोबरीची एक संधी असते. म्हणजे एका कल्पात १५ संधी असतात.

१४ मनु x १५ संधी = १ कल्प

१ महायुग = १२००० दि.व.

= ४३२०००० सौर वर्ष

आता

१ मनु = ७१ महायुगे =

७१ x १२००० = ८५२००० दिव्य वर्ष

= ३०६७२०००० सौर वर्ष

आता संधी सहीत पाहुया.

= १४ मनु + १५ संधी = १ कल्प

= (१४ x ८५२०००) + (१५ x ४८००)  

= ११९२८००० + ७२००० = १२००००००  दि.व.

= ४३२००००००० सौर वर्ष

श्लोक :- इत्थं युगसहस्त्रेण भूतसंहारकारक:कल्पो ब्राम्हमह: प्रोक्तं शर्वरी तस्य तावती२०

ब्राम्हदिवसप्रमाणम

भावार्थ :- ब्रम्हाचा १ दिवस एका कल्पा बरोबर व तेवढीच एक रात्र असते. म्हणजे २ कल्प बरोबर ब्रम्हाची १ अहोरात्र होते.

ब्राम्हा स़ष्टी एकत्र करून (अंत करून) एक कल्प निद्रा अवस्थेत रहातात. म्हणून प्रत्येक कल्पांपात प्रलय होतात.