साहित्यिक:बहिणाबाई चौधरी/विकिबुक्समधून स्थानांतरीत आवृत्ती

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

बहिणाबाई चौधरी[संपादन]

'''मन वढाय वढाय'''


मन वढाय वढाय उभ्या पीकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर

मन मोकाट मोकाट त्याले ठायी ठायी वाटा जशा वार्यानं चालल्या पानावर्हल्यारे लाटा

मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोन? उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी याचं न्यारं रे तंतर आरे, इचू, साप बरा त्याले उतारे मंतर!

मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात? आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायात

मन चप्पय चप्पय त्या नही जरा धीर तठे व्हयीसनी ईज आलं आलं धर्तीवर

मन एवढं एवढं जसा खाकसचा दाना मन केवढं केवढं? आभायात बी मायेना

देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात! आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत!

देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं!


माझी माय सरसोती

माझी माय सरसोती माले शिकवते बोली लेक बहिनाच्या मनी किती गुपित पेरली !!

माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता --भागवत पावात समावत आणि मातीमधी उगवत !!

आरे देवाचं दर्सन झालं झालं आप०सुक हिरीदात सुर्याबापा दाये अरूपाच रूप !!

तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानांमधी देवा तुझ येनजान वारा सांगे कानामधी !!

फुलामधी समावला धरत्रीचा परमय माझ्या नाकाले इचारा नथनीले त्याचं काय !!

किती रंगवशी रंग रंग भरले डोयात माझ्यासाठी शिरिरंग रंग खेये आभायात !!इठ्ठल मंदीर

माझं इठ्ठल मंदीर अवघ्याचं माहेर माझं इठ्ठल रखूमाई उभे इटेवर

टाय वाजे खनखन मुरदुंगाची धुन तथे चाललं भजन गह्यरी गह्यरीसन

टायकर्‍यांचा जमाव दंगला दंगला तुकारामाचा अभंग रंगला रंगला

तुम्ही करा रे भजन ऐका रे कीर्तन नका होऊं रे राकेस सुद्ध ठेवा मन

आता सरला अभंग चालली पावली जे जे इठ्ठल रखूमाई ईठाई माऊली

शेतामंदी गये घाम हाडं मोडीसनी आतां घ्या रे हरीनाम टाया पीटीसनी

उभा भक्तीचा हा झेंडा हरीच्या नांवानं हा झेंडा फडकावला झेंडूला बोवानं

आतां झाली परदक्षीना भूईले वंदन हेचि दान देगा देवा आवरलं भजन

आतां फिरली आरती भजन गेलं सरी बह्यना देवाचीया दारीं उभी क्षनभरी


कवयित्री - बहिणाबाई चौधरी


खोप्यावरी खोपा

[ सुगरण पक्ष्यातील नर झाडाला उलटं टांगलेले घरटे विणतो त्याला उद्देशून ही कविता आहे.मादी घरटे विणत नाही.दर्जा तपासून पाहाते. दर्ज योग्य असेल तर त्या नराची निवड करते. ]


अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिन झोका झाडाले टांगला !

पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला !

सुगरीन सुगरीन अशी माझी रे चतुर तिले जाल्माचा संगती मिये गाण्य गम्प्या नर

खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा!!

तिची उलूशीच चोच तेच दात तेच ओठ तुला देले रे देवान दोन हात दहा बोटं ???


कशाले काय म्हनू नाही


बिना कपाशीन उले त्याले बोंड म्हनू नही हरी नामा ना बोले त्याले तोंड म्हनू नही

नही वाऱ्याने हालल त्याले पान म्हनू नही नही ऐके हरीनाम त्याले कान म्हनू नही

पाट येहरीवाचून त्याले मया म्हनू नही नही देवाच दर्सन त्याले डोया म्हनू नही

निजवते भुक्या पोटी तिले रात म्हनू नही आखडला दानासाठी त्याले हात म्हनू नही

ज्याच्यामाधी नही पानी त्याले हाय म्हनू नही धावा ऐकून आडला त्याले पाय म्हनू नही

नही वळखळा कान्हा तिले गाय म्हनू नही जिले नही फुटे पान्हा तिले माय म्हनू नही

अरे वाटच्या दोरीले कधी साप म्हनू नही एके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हनू नही

दुधावर आली बुरी तिले साय म्हनू नही जिची माया गेली सरी तिले माय म्हनू नही

इमानाले इसरला त्याले नेक म्हनू नही जलमदात्याले भोवला त्याले लेक म्हनू नही

ज्याच्यामधी नही भाव त्याले भक्ती म्हनू नही ज्याच्यामध्ये नाही चेव त्याले शक्ती म्हनू नही

बहिणाबाई

अश्शि कश्शि येळि वो माये


अश्शि कश्शि येळि वो माये 

अश्शि कश्शि येळि

बारा गाडे काजळ कुकु पुरलं नाही लेणं साती समिंदरच पानी पानी ज़ालं नाही न्हाणं

धरतीवरलं चांदी सोनं डागीन्याची तुट आभायाच चोळी लुगडं लुगडं तेही ज़ालं थिटं

नशीबाचे नऊ गिर्हे काय काय तुज़्या लेखी गिर्हनाले खायीसनी कश्शि कश्शि गं ज़ाली सुखी

इडा पीडा संकटाले दिल्हा देहातुन ठाया देवा तुज़्या गया मधे त्या नररुंडाच्या माया

नऊ जनासी खाउ गेली सहज एक्या घोटी दहाव्याशी खाशी तवा कुटे राहील सर्वे सृष्टी

ब्रहमा इसनु रुद्रबाळ ख़्हेळीयले व्ह्टी कोमायात फ़ुटे पान्हा पान्हा गानं आलं वटी


मन


मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकलं हाकलं फिरी येते पिकावर

मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता व्हत भुइवर गेल गेल आभायात

मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोन उंडारल उंडारल जस वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी याच न्यार रे तन्तर आरे इचू साप बरा त्याले उतारे मन्तर

मन एव्हड एव्हड जस खसखसच दान मन केवढ केवढ आभायतबि मावेन

देवा आस कस मन आस कस रे घडल कुठे जागेपनी तुले अस सपन पडलघरोट


देवा, घरोट घरोट

तुझ्या मनांतली गोट

सर्व्या दुनियेचं पोट

घरीं कर्माचा मरोट

अरे, घरोट घरोट

वानी बाम्हनाचं जातं,

कसा घरघर वाजे

त्याले म्हनवा घरोट

अरे, जोडतां तोडलं

त्याले तानं म्हनू नहीं

ज्याच्यांतून येतं पीठ

त्याले जातं म्हनूं नहीं

कसा घरोट घरोट

माझा वाजे घरघर

घरघरींतून माले

माले ऐकूं येतो सूर

त्यांत आहे घरघर

येड्या, आपल्या घराची

अरे, आहे घरघर

त्यांत भर्ल्या आभायाची

आतां घरोटा घरोटा

दयन मांडलं नीट

अरे, घंट्या भरामधीं

कर त्याचं आतां पीठ

चाल घरोटा घरोटा

तुझी चाले घरघर

तुझ्या घरघरींतून

पीठ गये भरभर

जशी तुझी रे घरोटा

पाऊ फिरे गरगर

तसं दुधावानी पीठ

पडतं रे भूईवर

अरे, घरोटा घरोटा

तुझ्या माकनीची आस

माझ्या एका हातीं खुटा

दुज्या हातीं देते घांस

अरे, घरोटा घरोटा

घांस माझा जवारीचा

तुले सनासुदी गहूं

कधीं देते बाजरीचा

माझा घरोट घरोट

दोन दाढा दोन व्होट

दाने खाये मूठ मूठ

त्याच्यातून गये पीठ

अरे, घरोटा घरोटा

माझे दुखतां रे हात

तसं संसाराचं गानं

माझं बसते मी गात

अरे, घरोटा घरोटा

तुझ्यातून पडे पीठी

तसं तसं माझं गानं

पोटातून येतं व्होटीं

दाने दयतां दयतां

जशी घामानं मी भिजे

तुझी घरोटा घरोटा

तशी पाऊ तुझी झिजे

झिजिसनी झिजीसनी

झाला संगमरवरी

बापा, तुले टाकलाये

टकारीन आली दारीं !


जीव


जीव देवानं धाडला जल्म म्हणे 'आला आला' जव्हा आलं बोलावणं मौत म्हणे 'गेला गेला'

दीस गेला कामामधी रात नीजमधी गेली मरणाची नीज जाता जलमाची जाग आली

नही सरलं सरलं जीव तुझ येन जान जसा घडला मुक्काम त्याले म्हनती रे जीन

आला सास, गेला सास जीव तुझं रे तंतर अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर!

येरे येरे माझ्या जीवा काम पडलं अमाप काम करता करता देख देवाजीच रूप

ऐक ऐक माझ्या जीवा पीडयेलाच कण्हणं? देरे गांजल्याले हात त्याच ऐक रे म्हनन

अरे निमानतोंडयाच्या वढ पाठीवर्हे धांडा नाच नाच माझ्या जीवा संसाराचा झालझेंडा

हास हास माझ्या जीवा असा संसारात हास इडा पीडा संकटाच्या तोंडावर्हे काय फास

जग जग माझ्या जीवा असा जगणं तोलाच उच्च गगनासारख धरीत्रीच्या रे मोलाचं


पेरनी


पेरनी पेरनी आले पावसाचे वारे बोलला पोपया पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!

पेरनी पेरनी आभायात गडगड, बरस बरस माझ्या उरी धडधड!

पेरनी पेरनी आता मिरुग बी सरे. बोलेना पोपया पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!

पेरनी पेरनी अवघ्या जगाच्या कारनी. ढोराच्या चारनी, कोटी पोटाची भरनी.


राजा शेतकरी


जसा बोल्यले कर्रय तसा कामाले करारी सभावानं मन मोका असोद्याचा शेतकरी

कारामधी रोखठोक नही उसनउधारी दोन देये दोन घेये असा राजा शेतकरी

असा राजा शेतकरी चालला रे आढवनी देखा त्याच्या पायाखाले काटे गेले वाकसनी

बोरू चाले कुरुकुरु तश्या पाट्या पेनाशिली पोर्‍हं निंघाले शिक्याले कधीमधी टांगटोली

हाया समोरची शाया पोर्‍हं शायीतून आले हुंदडत हायाकडे ढोरं पान्यावर गेले

अरे असोद्याची शाया पोर्‍हं शंबर शंबर शायामधी भारी शाया तिचा पह्यला नंबर

इमानानं शिकाळती तठी 'आबा' मायबाप देती अवघ्याले इद्या भरीभरीसनी माप

बहिणाबाई चौधरी


म्हन


दया नही मया नही, डोयाले पानी गोगलगायच्या दुधाचं काढा वो लोनी

केसावार रुसली फनी एकदा तरी घाला माझी येनी

कर्‍याले गेली नवस आज निघाली आवस

आग्या टाकीसनी चुल्हा पेटत नही टाया पिटीसनी देव भेटत नही

पोटामधी घान, होटाले मलई मिय्याच्या तांब्याले भाइरून कल्हई

तवा खातो भाकर, चुल्हा भुकेला पव्हारा पेतो पानी, राहाट तान्हेला

मानसानं घडला पैसा पैशासाठी जीव झाला कोयसा

मानूस मोठा हिकमती, याचं घोंगडं त्याच्यावर दगडाचा केला देव शेंदूराच्या जीवावर

डोयाले आली लाली चस्म्याले औसदी लावली

वडगन्याले ठान नही घरकोंबड्याले ग्यान, नही घरजवायाले मान नही

म्हननारानं म्हन केली जाननाराले अक्कल आली

बहिणाबाई चौधरी.


- माणूस -


मानूस मानूस मतलबी रे मानसा, तुले फार हाव तुझी हाकाकेल आशा मानसा मानसा, तुझी नियत बेकार तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर भरला डाडोर भूलीसनी जातो सूद खाईसनी चारा गायम्हैस देते दूध मतलबासाठीं मान मानूस डोलये इमानाच्यासाठीं कुत्रा शेंपूट हालये मानसा मानसा, कधीं व्हशीन मानूस लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस !अरे संसार संसार...


अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तव्हा मियते भाकर!

अरे संसार संसार खोटा कधी म्हनू नहीं राऊळच्या कळसाले लोटा कधी म्हनु नहीं

अरे संसार संसार नहीं रडन कुढ़न येड्या, गयातला हार म्हनू नको रे लोढ़न!

अरे संसार संसार खीरा येलावरचा तोड एक तोंडामधि कडू, बाकी अवघा लागे गोड..

अरे संसार संसार, म्हनू नको रे भिलावा त्याले गोड भिमफूल, मधि गोडम्ब्याचा ठेवा.

देखा संसार संसार, शेंग वरतून काटे अरे, वरतून काटे, मधी चिकने सागरगोटे

ऐका, संसार संसार दोन्ही जीवाचा ईचार, देतो दु:खाले होकार, अन सुखाले नकार..

देखा संसार संसार, दोन्ही जीवाचा सुधार कधी नगद उधार सुखा दु:खाचा बेपार..

अरे संसार संसार असा मोठा जादूगार माझ्या जीवाचा मंतर त्याच्यावरती मदार

असा संसार संसार आधी देवाचा ईसार माझ्या दैवाचा जोजार मंग जीवाचा आधार..!


'करमाची रेखा'ठळक मजकूर


खालील कविता वैधव्य आल्यावर नशीबावर लिहिली

लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली पुशिसनी गेल कुंकू रेखा उघडी पडली

देवा तुझ्याबी घरचा झरा धनाचा आटला धन रेखाच्या चरयाने तयहात रे फाटला

बापा नको मारू थापा असो खऱ्या असो खोट्या नाही नशीब नशीब तयहाताच्या रेघोट्या

अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले नशीबाचे नऊ गिर्हे ते बी फिरत राह्यले

राहो दोन लाल सुखी हेच देवाले मांगन त्यात आले रे नशीब काय सान्गे पंचागन

नको नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहू माझ दैव माले कये माझ्या दारी नको येऊ

बहिणाबाई


गिऱ्हे = ग्रह


आदिमाया

आशी कशी येळी व माये, आशी कशी येळी?

बारा गाडे काजळ कुंकू

पुरल नहीं लेनं

साती समदुराचं पानी

झालं नही न्हानं

आशी कशी येळी व माये, आशी कशी येळी?

धरतीवरलं चांदी सोनं

डागीन्याची तूट

आभायाचं चोयी लुगडं

तेभी झालं थिटं

आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?

इडा पिडा संकटाले

देल्हा तूनें टाया

झाल्या तुझ्या गयामंधीं

नरोंडाच्या माया

आशी कशी येळी व माये , आशी कशी येळी?

बरह्मा इस्नू रुद्र बाळ

खेळईले वटीं

कोम्हायता फुटे पान्हा

गानं आलं व्होटीं

आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?

नशीबाचे नऊ गिर्‍हे

काय तुझ्या लेखीं?

गिर्‍ह्यानाले खाईसनी

कशी झाली सुखी ?

आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?

नऊ झनासी खाउन गेली

सहज एक्या गोष्टी

दहाव्याशी खाईन तेव्हां

कुठें राहिन सृष्टीं

आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?