सदस्य चर्चा:Shardha12

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

नमस्कार,

आपल्या मिपाव्यनि शंकेस उत्तर टंकले आणि मिपाच्या सर्वरने ते गिळल्याचा संदेश दिल्यामुळे हरवले आहे. पुन्हा सगळे लिहावे लागेल. ते संध्याकाळी करतो. विलंबासाठी क्षमस्व.

Mahitgar (चर्चा) १३:१५, २९ सप्टेंबर २०१५ (IST)

वर म्हटल्याप्रमाणे मराठीतून टंकलेले गेले आहे. तुर्तास इंग्रजीतून सहाय्य:Page status आणि सहाय्य:Proofread हि दोन साहाय्य पाने बघता येतील. त्यांचा अनुवाद करून हवा असला तरीही त्यासाठी स्वत: वेळ देण्यापेक्षा मिपासारख्या ठिक्काणी काहीरात करून अजून वेगळे नवे व्हॉल्यूंटीयर्स शोधणे अधिक श्रेयस्कर असावे असे वाटते.
Mahitgar (चर्चा) १३:२७, २९ सप्टेंबर २०१५ (IST)


अनुक्रमणिका टेबल स्वरुपात केली तर अधिक श्रेयस्कर राहील काय? एका पानावरील २-३ ओळींचे बनवले आहे. [१]

ह्या संदर्भात सदस्य:sagarpdy यांनी व्यनिने काही इंग्रजी विकिस्रोतातील काही सुविधा पुरवता येऊ शकतील का याची चर्चा केली आहे. काही विशेष सुविधा उपलब्ध होण्यासाठी दोन-चार दिवस वाट पहावी तो पर्यंत साधे टंकन करून ठेवावे अथवा इतर पाने करावीत, सारणीत रुपांतरण करावयाचेच ठरल्यास तसे थोड्या कालावधीने केव्हावी करता येऊ शकेल, ते फारसे अवघड असणार नाही.
हा विषय निर्देशीत करण्यासाठी धन्यवाद आणि पु.ले.शु.
Mahitgar (चर्चा) १२:१२, ३० सप्टेंबर २०१५ (IST)

नमस्कार श्रद्धा. आपण उल्लेखल्याप्रमाणे टेबल वापरणे सोईस्कर पर्याय आहे. किमान आवश्यक ते विकल्प इंग्रजी विकी मधून उपलब्ध होईपर्यंत. उदा [२] मध्ये मी काठा शिवाय टेबल वापरले आहे. सोबत काही अलाईनमेन्ट चे पर्याय वापरले आहेत. तसेच काही अनुक्रमानिकेबाबत करता येउ शकेल. अर्थात मी स्वतः अनुक्रमणिका नंतर बनवणार आहे, प्रथम केवळ मजकूर असलेल्या पानावर काम करण्याचा मानस आहे. Sagarpdy (चर्चा)

धन्यवाद सागर. काठाशिवाय टेबल करण्याचा आधी पण प्रयत्न केला होता, पण कुठे पर्याय दिसत नव्हता. मला इथे मदत शोधायला बराच त्रास होतो आहे. एक तर विकि मधेच नविन आहे, त्यात मराठी मधे समजायला जास्त प्रोब्लेम येतोय. इंग्रजी हेल्प शोधून वाचली टेबल बद्दलची पण फार user friendly नाही वाटली किंवा मी भलतीकडेच शोधले असणार. तुमची अनुक्रमणिका मस्त दिसतीये, तसेच काही इथे करावे लागणार आहे. असो, सध्या मजकूर असलेली पाने सुरू केली आहेत. खूप वेळ असेल त्या दिवशी टेबल ट्राय करेन. अनुक्रमणिका पानावरील मजकूर फक्त टाईप करून ठेवला तर जास्त बरे की टेबल क्रिएट करून मग त्यात टाईप केलेला जास्त बरा पडतो ? Shardha12 (चर्चा) ०९:२५, १३ ऑक्टोबर २०१५ (IST)


अनुक्रमणिकेसाठी एक प्रयत्न केला आहे https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B2%E0%A5%8B._%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96.pdf/%E0%A5%A7%E0%A5%A7 (लिंक कशी द्यायची ?) कॉलम विड्थ वाढवता येईल काय?Shardha12 (चर्चा) १५:४०, १४ ऑक्टोबर २०१५ (IST)

--Shardha12 (चर्चा) १२:४९, १६ ऑक्टोबर २०१५ (IST) टूलटिप्स दिसत नाहीत. फक्त छोटे चौकोन दिसतात, क्रोम आणि एई दोन्हीमधे. दिसण्यासाठी काय करावे?--Shardha12 (चर्चा) १२:४९, १६ ऑक्टोबर २०१५ (IST)

नमस्कार श्रद्धा. आपण दिलेल्या दुव्यावर काही संपादन केले आहे. टेबल च्या रुंदी चा तरी प्रश्न सोडवला गेला आहे असे वाटते. प्रत्येक कॉलम च्या रुंदी ची जुळवाजुळव अजून करून नाही बघितली . तरी या आराखड्यावर पुढे काम होऊ शकेल. अनुक्रमानिकेतील '…' व '_"_' योग्य व मुल पुस्तकात अभिप्रेत असलेल्या अर्थाने प्रदर्शित करणे थोडे कष्टाचे आहे. मला स्वतः फारसे CSS अथवा HTML येत नाही. काही उपाय सुचल्यास कळवेन. --Sagarpdy (चर्चा) १८:२५, १९ ऑक्टोबर २०१५ (IST)