मराठी राजभाषा दिन

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search


                                                      " मराठी राज भाषा दिन - 27 फेब्रवारी "


  27 फेब्रवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो . मा. विषणू वामन शिरवाडकर यांचा जन्म दिवस( 27 फेब्रवारी 1912 ,नाशिक जिल्हा पिंपळगाव) आसतो. कुसुमाग्रज हे त्यांचे टोपन नाव होय.त्यांचे खरे नाव गजानन रघुनाथ शिरवाडकर.परंतु ते दत्तक गेल्यामुळेे त्यांच्या नावात बदल होऊन विष्णु वामन शिरवाडकर असे नाव परिधान केले. कुसुमाग्रज या नावाने त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे.कुसुमाग्रज म्हणजे कुसुमचा मोठा भाऊ .कुसुम बहिणीचे नाव व अग्रज म्हणजे मोठा भाऊ.त्यांनी मराठी भाषेत कथा,कविता ,कादंब-या ,बालनाटके,ललित लेख लिहून मराठी भाषेला अत्युच्च शिखरावर पोहोचविले.
  ' जीवनलहरी ' हा छोटासा काव्यसंग्रह 1933 साली प्रकाशित झाला.ख-या अर्थाने त्यांना कवी म्हणून "विशाखा" या काव्यसंग्रह मान्यता मिळवून दिली.'रसयाञा 'ह्या पुस्तकात त्यांनी विविध वाडऽमय प्रकार हाताळले.

कुसुमाग्रजांच्या कविता प्रतिकात्मक स्वरुपाच्या आहेत. कोलंबचे गर्वगीत , पाचोळा, आगगाडी,गुलाम ग्रजा जयजयकार या कविता त्यांनी लिहिल्या .'पृथ्वीचे प्रमगीत" ही कविता तर का्व्यतला अंलकरहोय. 14 नाटके, 6 अनुवादित नाटके,3 कादंब-या,6 कथा संग्रह व 7 लेखसंग्रह एवढे विपुल लेखन त्यांच्या नावावर आहे.

   कुसुमाग्रज हे नाटककार म्हणून ही त्यांची सर्वञ ख्याती आहे. ययाति , देवयानी ,वीज म्हणाली धरतीला ,नटसम्राट या नाटकांना राज्यपुरस्कार मिळाला.