पान:Yugant.pdf/78

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेयुगान्त / ५९चारपिता-पुत्र पोरक्या पांडवांचे रक्षण कुणी केले? कुंती जागरूक होती, पण त्यांना मारायच्या ज्या युक्त्या योजिल्या होत्या, त्यातून त्यांना कोणी निभावून नेले?- विदुराने.
 भीष्माने धृतराष्ट्राच्या आणि पांडूच्या मुलांना शिकवण्याची व्यवस्था केली, पण पांडवांच्या रक्षणासाठी खास प्रयत्न केले नाहीत. धार्तराष्ट्रांची व पांडवांची स्पर्धा होती हे त्याला उमजलेच नव्हते, असे तर नाही? तो काही करण्यास असमर्थ होता का? का तो उदासीन होता? जे कुळ निर्वंश व्हायला घातले होते, ते सावरले. एकही नव्हता तेथे दोघे आले. व दोघांचे एकशे-पाच झाले. त्या एकशे-पाचांतले काही गेले, तरी त्याला पर्वा नव्हती. कुरूचा वंश हस्तिनापरच्या गादीवर असला म्हणजे मिळवली. एवढ्यापुरताच का भीष्म जागरूक होता? तसे म्हणता येत नाही; पण एवढे मात्र खरे की, द्रौपदीच्या स्वयंवरापर्यंत भावाभावांच्या स्पर्धेची व धृतराष्ट्राच्या दष्ट हेतुंची त्याने मुळीच दखल घेतली नाही. त्याला त्याची वार्ताही नव्हती असे दिसते. पांडवांच्या हिताला बापाप्रमाणे जपला तो विदुर, पण विदुर स्वतःच इतका परतंत्र की