पान:Yugant.pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
आठ / युगान्त


एच.डी.चे विद्यार्थी श्री. डिंगरे ह्यांनी बऱ्याच लेखांची नक्कल केली. टीकाकारांनी व लेख प्रसिद्ध झाल्यावर शंका काढणाऱ्यांनी विचाराला चालना दिली, व लेख परत तपासून त्यांतील चुका काढून टाकण्यास मदत केली. घरची मुले जाई, रजनी, गौरी व आनंद ह्यांच्या, इतरांच्या मानाने जरा जादा निर्भीड मतप्रदर्शनामुळे लेख लिहिताना जास्त खबरदारी घेतली गेली. यजमानांनी मदत केली. व्याकरण तपासले, इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग तपासले-टीका मात्र मुळीच केली नाही. ज्या अनेक मित्रांनी हे पुस्तक प्रसिद्धीस आणण्यात मदत केली, त्यांत प्रा. अरविंद मंगरुळकर ह्यांचा आवर्जून उल्लेख करावयास पाहिजे. त्यांनी अनवधानाने राहिलेल्या व इतरही कित्येक चुका दाखवून दिल्या व हस्तलिखित सुधारण्याची मला संधी दिली. देशमुख पतिपत्नींची मदत सर्वच बाजूंनी झाली. लेख तपासणे, टीका करणे, नकला करणे व मी अगदी कावून गेले असले, म्हणजे मला संभाळून घेणे ही सर्वच कामे त्यांच्यावर पडली. ही सर्वांची मदत, चालना व टीका नसती, तर लेख लिहूनच झाले नसते.


दिनांक : १४ जानेवारी १९६७

इरावती कर्वे