पान:Yugant.pdf/248

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त/२३१
 

केला तर म्हणावे लागेल, 'मित्र' शब्दाचा अर्थच बदलला.
 महाभारतापर्यंत आपले वाङ्मय ही स्वतंत्र नवनिर्मिती होती.
 टीकावाङ्मय हे सर्व नंतरचे. नवनिर्मितीही होत होती, पण टीकावाङ्मय जास्त होते. एक प्रकारे हा क्रम सर्वच जागतिक वाङ्मयात दिसतो. वाङ्मयाच्या सुरवातीला सर्वच नवनिर्मिती असते. हीच निर्मिती पुढील टीकावाङ्मयाचा पाया असते. महाभारत हे आपले प्राथमिक वाङ्मय. त्याने पुढच्या कित्येक शतकांच्या काव्य-नाटकांना, कथा-पुराणांना व टीकावाङ्मयाला खाद्य पुरवले.
 महाभारतीय समाज बऱ्याच अर्थांनी संकुचित होता. त्याच्या जीवनाचे चित्र दाखवते की, आधिभौतिक दृष्टीने- द्रव्याच्या दृष्टीने- तो कृषि-गोरक्षकांचाच होता. वैदिक आर्य येथल्या लोकांत मिसळू लागले होते. पण त्यांचे सांस्कृतिक जीवन बहुतांशी गोरक्षक आर्यांच्याच मर्यादेत राहिलेले होते. घोडे हे त्यांचे आवडते जनावर. घोड्यांच्या संख्येवर, रूपावर व गुणांवर क्षत्रियांचा मोठेपणा अवलंबून असे. बऱ्याचशा राजांची नावेही घोड्याच्या मालकीची वा गुणांची निदर्शक होती. उदा. 'हर्यश्व' (तांबडा घोडा असलेला); 'अश्वपति' (घोड्यांचा स्वामी); 'श्वेतवाहन' (अर्जुनाचे एक नाव); 'युवनाश्व' (एका प्रसिद्धपूर्वकालीन राजाचे नाव). सारथी असणे, व रथातून लढणे (महारथी, रथी, अतिरथी) हा मोठेपणा समजला जाई. घोडा जोडलेले रथ असत. रथांची चाके अरा असलेली होती. रथ लहान-मोठे असत. पण महाभारतकाली कोणाला घोड्यावर बसता येत नसे. ती कला ख्रिस्तोत्तरकाली, म्हणजे भारतीय युद्धानंतर हजार वर्षांनी हिंदुस्थानात आली.
 गोरक्षण व कृषी हा जीवनाचा पाया होता. गोमांस खात असत का? असत, असाही पुरावा नाही. नसत, असाही पुरावा नाही. वेदब्राह्मण-काली खात होते. सणासुदीला, विद्वान ब्राह्मणासारखा मोठा पाहुणा आला, तर खाण्याचा तो जिन्नस होता. तसा उल्लेख महाभारतात नाही. खात नसतीलच, असेही नक्की