पान:Yugant.pdf/235

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२१८ / युगान्त

की, पश्चिमी साम्राज्याच्या अस्तानंतरचे हे वैराग्य आहे. अंतकाळच्या ह्या वेदना आहेत. जयाच्या क्षणाला 'जयोऽयमजयाकारो भगवन् प्रतिभाति मे' म्हणून दुःखाने रडणारा धर्म किंवा आपण सगळ्यांना मारू शकू, ही खात्री असताही 'एतान् न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन। अपि त्र्यैलोक्यराज्यस्य हेतोः। किं नु महीकृते॥' असे म्हणणारा अर्जुन ह्यांची धर्माची वा मानवी यशाच्या वैफल्याची जाणीव अधिक तीव्र व अधिक आतली वाटते.

न ही प्रपश्यमि ममापनुद्याद्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्॥

ही माणसे मरणार व आपण शोकाने झुरत राहणार, हे अर्जुनाला स्पष्ट, ठाम दिसत होते. अशावेळी ह्यांना मारूच नये; जे मिळणार, त्याची किंमत जबर आहे, असे वाटणे हे स्वजनाबद्दल प्रेम व दया दाखवते. श्रीकृष्णाचे उत्तर एका अर्थाने उत्तरच नव्हते. हे अन्यायी आहेत ह्यांना मारले पाहिजे, अशा तऱ्हेच्या न्यायावर आधारलेला एक भाग आहे; पण अर्जुनाचे उद्गार न्याय की अन्याय, ह्यावर आधारलेले नाहीत. मुख्य रोख आहे, तो न्यायान्यायावर नसून प्राप्त परिस्थिती व समाजातील स्थान ह्यांवर आहे. त्याचबरोबर मनुष्याचे जीवित क्षणभंगुर आहे, परत-परत येणारे आहे ह्यावरही रोख आहे. एकदा मनुष्याच्या विश्वातील स्थानाबद्दल विचार करावयास लागले, म्हणजे सर्वच क्षुद्र वाटू लागते. पण कृष्णाचे म्हणणे तसे नव्हते. ब्रह्मसत्यापर्यंत पोहोचले, म्हणजे इतर सर्वच मिथ्या. पण तिथपर्यंत पोहोचण्याआधी हे मिथ्यात्व गृहीत करून प्राप्त कर्तव्यापासून स्वतःला वाचवता येणे शक्य नाही, अशी त्याची भूमिका होती. एका दृष्टीने सर्वच मानवी मूल्ये सापेक्ष दिक्कालसापेक्ष म्हणून पूर्ण सत्य- नव्हेत. दुसऱ्या दृष्टीने अपरिपूर्ण अशा मानवयोनीत तीच दिशा दाखवतात व आयुष्यात अर्थ भरतात, असे कृष्णाचे सांगणे होते. अलिप्त रहावयाचे, पण नवीन वाङ्मयात आढळणारा 'Stranger' ‘(उपरा) किंवा केवळ 'Witness'