पान:Yugant.pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अठरा / युगान्त

आला नसता. पण ज्या प्रकरणावर टीका लिहिल्या आहेत. ते सबंध प्रकरणच नसावे, म्हणजे शारदादि पोथ्यांच्या (-ज्यांचा काल दुदैवाने माहीत नाही,-) जुनेपणाबद्दल पुरावा मिळतो.
 आंध्रात वादिराज नावाच्या कवीने ह्याच सुमारास तेलुगू भाषेत महाभारताचे भाषांतर मुळातील श्लोक न वगळता केले आहे. त्याही भाषांतराची छाननी करून वादिराजापुढे कोणती प्रत असावी, ह्याची छाननी झाली.
 महाभारत-ग्रंथ जावामध्ये १५००च्या सुमारास गेला व तेथे त्याचे तिकडील भाषेत भाषांतर झाले. अधूनमधून मूळ संस्कृत श्लोकांचे व श्लोकार्थांचे बरेच भ्रष्ट असे उतारे त्यांत आहेत. ह्या उताऱ्यांचाही तुलना करताना फार उपयोग झाला. पुष्कळदा जुना संस्कृत शब्द न कळल्यामुळे जेथे नवा शब्द देवनागरी आवृत्त्यात घातलेला आहे, तेथे जावा-आवृत्तीत जुनाच शब्द सापडला आहे.
 ह्या तीन ग्रंथांखेरीज महाभारतावरील टीकाकारांच्या टीकांचाही फार उपयोग झाला आहे. ते टीकाकार पुढीलप्रमाण देवबोध- विमलबोध- सर्वज्ञ-नारायण- अर्जुनमिश्र-नीलकंठ.
 देवबोधाची टीका ‘ज्ञानदीपिका' या नावाची आहे. देवबोध इ.स.१०००-११००च्या सुमाराचा असावा. सर्वांत जुना टीकाकार, तसाच अतिशय विद्वान, म्हणून त्याची ही टीका फार उपयोगी पडली. विमलबोधाची टीका ‘दुर्घटार्थप्रकाशिनी' किंवा ‘विषमश्लोकी' नावाची आहे. काल नक्की नाही. सर्वज्ञ- नारायणाची टीका ‘भारतार्थप्रकाश' नावाची आहे. काल सुमारे इ. स. ११००. अर्जुनमिश्राच्या टीकेचे नाव ‘भारतार्थप्रदीपिका, ‘काल सुमारे इ.स. १४००, नीलकंठाची टीका ‘भारतभावदीप' नावाची व तिचा काल सुमारे इ. स. १७०० ह्याची माहिती सर्वांत जास्त. हा गोदावरी तीरावरील कोपरगावचा राहणारा, जातीने ब्राह्मण. बाप गोविंदसूरी व आई फुल्लाम्बिका, देवबोधाच्या टीकेत बरीच प्रकरणे नाहीत. ती