पान:Yugant.pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



युगान्त / पंधरा

नावाचे काव्य, असा तर्क आहे. पाच शिष्यांना कथा सांगितली, तिची प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे व कलाप्रमाणे मांडणी केली. जैमिनीने दुर्योधनाच्या बाजूने लिहिले असावे, असा तर्क आहे. (आश्वमेधिक-पर्वातील प्रो.करमरकरांची प्रस्तावना पहावी.) तिघांनी लिहिली असल्यास आज त्यातील काहीच उपलब्ध नाही. आपल्यापुढे जी कथा आहे, ती वैशंपायनाने अर्जुनाच्या पणतवाला

(जनमेजयाला) जी सांगितली, तिची वाढवलेली आवृत्ती आहे. कारण ही कथा उग्रश्रवा लोमहर्षणीने नैमिषारण्यात कुलपती शौनकाला जी सांगितली, ती आहे, व्यासभारत, वैशंपायन-भारत, लोमहर्षणीने वैशंपायनाचे म्हणून सांगितलेले ते मूळ महाभारत, अशा पायऱ्या कल्पिल्या आहेत. ह्या मूळ महाभारताची एक पायरी उत्तरेकडच्या सध्याच्या पोथ्यांच्या मुळाशी व दुसरी दक्षिणेकडच्या पोथ्यांच्या मुळांशी. उत्तरेकडील मुळातून वायव्येकडील एक आवृत्ती निघाली. (ह्याला सुखटणकरांनी 'न्यू ν ' हे ग्रीक अक्षर घातले आहे,) तीपासून शारदा व देवनागरी ह्या लिप्यांत लिहिलेल्या पण शारदेवर आधारलेल्या पोथ्या निघाल्या. गंगेच्या खोऱ्यासाठी (-‘गामा γ ' हे ग्रीक अक्षर-) एक version होते. त्यातून