पान:The History of Antiochus Epiphanes or the Institution of the Feast of Dedication.pdf/18

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


ती गेला तेथें तेथें त्यावर बंडावा होऊन (तेथील लोक) त्यास पळपुटा असें बेोलू लागले.

यानंतर हाशमोनायचे पुत्र पवित्र मंदिरांत आले, आणि त्यांनीं मोडके दरवाजे बांधिले,भोकें बंद केलीं आ: णि अगणित मुडद्यांनीं व अमंगळ पदार्थानीं मंदिर विटाळ लें होतें तें त्यांनीं शुद्ध कलैं. मग ( तेथील ) समई पटवि ण्याकरितां जाईताचें शुद्ध तेल ते शोधू लागले; परंतु त्यां स एक कुषि मात्र सांपडली. तिजवर मुख्य याजकाची मोहर केलेली होती, यावरून तें शुद्ध होतें असें त्यांस वाटलें. त्यांत एक दिवस जळेल एवढेंच मात्र (तेल ) हो तें; परंतु आकाशाचा देव ज्यानें आपलें नाव तेथें ठेवि ले होतें, त्यानें न्यास आशीर्वाद दिल्यावरून त्याकडून आठ दिवस दिवे लागले.

यावरून हाशमोनायचा पुत्रांनीं असा ठराव केला आणि आपणा बरोबर सर्व इस्राएलांवरहि असा दृढ नियम केला कीं, आकाशाचे देवानें दिल्हेला जय प्रगट का रण्या करितां शास्त्रांत लिहिलेल्या सना प्रमाणें हे आठदिवस आनंदाचे व हषांचे मानून त्यादिवशीं दिवे लावा वे. आणि ( या दिवसांत ) शोक करूंनये आणि उपा स किंवा दु:ख ठरवृंनये; परंतु या गोठीमध्यें जें क्यांकरितां घडून आलें, त्यावरून त्यांनीं आपल्या देवाची भार्थना करावी. परंतु हाशमोनाय व त्यांचे पुत्र व त्याचे बंधू यांनीं, उद्योग करून काम करण्यास मना आहे असें का हीं ठरविलें नाहीं. या वेळेपासून यावानांचे राज्याची कीर्ति वाढली नाहीं. तेव्हांपासून देवाचे मंदिराचा नाश हेोईपर्यंत म्हणजे दोनशें सहा वर्षे हाशमोनायच्या पुत्रां