पान:The History of Antiochus Epiphanes or the Institution of the Feast of Dedication.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५ णाला, तुम्ही कां परतला ? त्यांनी उत्तर केलें की, आ- |म्हा सर्वांत जो चांगला तो आमचा भाऊ येहुदा मार- ला गेला म्हणून (आह्नी परतलों ). यावरून त्यांचा बाप मतातया हा त्यांस उत्तर करून म्हणाला की, मी तुम्हांबरोबर येऊन त्या लोकांशी लढेन, नाहीतर कदा-- चित इस्राएलाचे घराण्याचा नाश होईल; आणि तुझी तर आपल्या भावा करितां विस्मित झालां. मग मता- | तया आपल्या पुत्रांबरोबर निघाला, आणि त्यालोकांशी | लढला. आकाशाच्या देवानेंहि त्या लोकांतील सर्व बळवा- न त्यांच्या हाती दिल्हे; आणि त्यांनी तरवार चालिव- णाऱ्यांचा, धनुर्धान्यांचा, सैन्याच्या सरदारांचा व दुसरे सरदारांचा मोठा वध केला; असा की यांतून कोणींच वांचला नाहीं; आणि लोक समुद्रा कडील प्रांतांत पळून गेले. एलआझार हा हत्ती मारण्याच्या कामांत गुंतला. होता; परंतु हत्ती त्याजवर पडून तो गडद झाला. त्या चे भाऊ परत येऊन त्याचा शोध केल्यावर तो त्यांस हत्तीच्या खाली गडद झालेला सांपडला. तरी इस्राएलाचे पुत्रांचे हाती त्यांचे शत्रू मिळाले, म्हणून त्यांनी हर्ष के- | ला; आणि त्यांतून कित्येकांस जाळून, कित्येकांस तरवा- रीने भोसकून, किन्येकांस सुळावर फांशी देऊन मारिलें.. आणि दुष्ट बगरीस जो आपल्या लोकांस वांकड्या मार्गाकडे वळवीत असे, न्यासहि इस्राएलाचे घराण्यानें अ-- मीनें जाळिलें यात्र दुष्ट बगरीस व न्याबरोबरचे सैन्याचे सर्व सरदार मारले गेले. हें जेव्हां आनतिओ- खोस राजानें ऐकिलें; तेव्हां तोहि एका तारवावर चढून समुद्रा कडील प्रांतांकडे पळून गेला. परंतु जेथें जेथें