पान:The History of Antiochus Epiphanes or the Institution of the Feast of Dedication.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ म्यांनी आकाशाच्या देवावर भरंवसा ठेविला होता. तेव्हां दुष्ट बगरीस एका तारवावर चढून आनतिओखोस राजा- | कडे पळून गेला; आणि जे तरवारेपासून वांचले तेहि न्याबरोबर गेले. तिकडे गेल्यावर बगरीस, आनतिओखोस राजास उत्तर करून म्हणाला की, हे राजा, येहुद्यांतून शाब्बाथ, प्रतिपदा व सुंता हीं रद्द करायास तूं आज्ञा | दिल्ही होतीस; परंतु न्यामुळे दगा व मोठा बंडावा झाला. जरी सर्व लोक व राष्ट्र गेलीं, तरी मतातयाचे पांच पुत्रां- पुढे त्यांचे कांहींच चालायाचें नाहीं. ते सिंहा पेक्षां बल- कट, गरुडापेक्षां हलके, आणि आस्वला पेक्षां चपळ आ- हेत. तर आतां थोडक्या मनुष्यांनी तूं लहूं नको, जर त्यांसी लढशील तर राजा पुढें तूं लज्जित होशील; हें माझें मत्त तुला चांगलें आहे. यास्तव सर्व सैन्याच्या सरदारांनी यावें, त्यांतून एकानेंही राहूनये; आणि त्यां बरोबर कव च पांघरलेले हत्तीहि असावे, असी पत्र लिहून तुझ्या राज्याच्या सर्व नगरी पाठीव. ही गोष्ट आनतिओखोस | राजास बरी दिसून त्यानें आपल्या राज्याच्या सर्व नग रीं पत्रे पाठविलीं; त्यावरून सर्व लोकांचे व राज्याचे स रदार आले आणि त्यांबरोबर कवच पांघरलेले हत्तीहि आले. मग दुसऱ्या वेळी दुष्ट बगरीस उठून येरुशालेमांस आला आणि (नगराच्या भिंती फोडून व दरवाजे मो. डून पवित्र मंदिरांतहि त्यानें तेरा छिवें केली. आणि दगडहि फोडून त्यानें माती केलो. तो आपल्या मनां- त असें समजला की, यावेळी ते मजवर ( प्रबल होऊं ) शकणार नाहीं; कारण माझें सैन्य मोठे असून माझा हात अबल आहे; आणि आकाशाचे देवाचे मनीहि असें २