पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/६१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत


२४ बिनत ( हें गीत नेहमीं ऋणावें असें बहुतेक सात्विक लोक ह्मणतात) जगताच्या व सर्व काळच्या प्रभु ! तूं राजा, राजांचा राजातूं , पराक्रमी व अद्धत कृत्यं करणारा आहेस; आणि त मजकडून वर्णिली जाव हें योग्य आहे. तर हे पवित्र देवा ! सर्व प्राणी म्हणजे पवित्र दूत, मनुष्य पुत्र, शेतांतील पशु व आकाशांतील पक्षी यांस उत्पन्न करणाच्या ! सकाळ व संध्याकाळीं मी तुझी स्तुति करितों .* तुझी कृत्ये अगणित व माहान आहेत; तू उंचास नीच करितोस, ओणव्यास उपें करितोस; मनुष्य जरी हजारों वर्षे वांचला, तरी तुझा पराक्रम त्याच्या लक्षांत येणार नाही ! है गौरववान व महस्ववान देवा ! तुझ्या शेरडांस सिंहांच्या जबड्यांतून सोडीव; आणि ज्या लोकांस तं इतर लोकांतून निवडून घेतलेंस, त्या तुझ्या लोकांस दास, स्वतून सोडीव. तुझ्या मंदिराकडे आणि अति पवित्र ठिकाणाकडे, ज्या ठिकाणीं आत्मे व प्राण एकवट होतील, त्याजकडे मीरझणजे सुंदर येरुशलेम नगरी ते तुझे गायन व कीर्तन करितील. ( शाब्बाथ असून प्रतिपदा असते त्या दिवसाकरितां विनंती. ) हे मझे सुज्ञ लोकहो ! तुम्ही देवला ग, माझ्या गायनाचीं गीतं गा; आजचा दिवस हा परमेश्वराचा शाब्बाथ व प्रतिपदेचा दिवस अहे. त्याच्या नामाचे गौरव गाजवा व सर्वांस ऐकवा, परमेश्वर राजापुढे तु कीर्तन व गजर कर. त्याचे पवित्र मंदिर बांधलें जण्यास तुम्ही त्यास साह्य करा, की त्यास शोधण्यास स्वरा करा, त्याच्या पवित्र नामानं स्तुति करा, परमेश्वरास शोधणारांचे मन हर्षित होवो. सात्विक जन तुझे नाम स्तवितील व तुझी दया वर्णलहे परमेश्वरा, आकाशही तुझ्या आश्चर्याच्या कृत्यावरून तुझी स्तुति व गौरव करितें. मी येऊन तुझं नाम पवित्र मानित, आणि तुझ गीतं गातों हीं माझीं प्रथम वचनें मी परमेश्वरस अर्पितों.

  • इ. रचितों. त्याने पवित्र मंदीर लवकर बांधावें म्हणून तुम्ही आपलें

आचरण सुधारून त्याची कृपा संपादन करा.