पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/२७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत


विनंती. आमचे अपराध, आमचीं उल्लंघन व पापंहे पुसून टाक; आणि हे अनंता ! तूं, आपल्या दयेने आमचा गर्यं क्षमा कर. हे परमेश्वरा ! माझे डोळे व माझी याचना तुजकडे आहेत; आम्हांस दुःखांतून काढून सुखांत आण. हे जगताच्या स्वामी, मी सर्वदा तुझीच आशा करितो; तुझ्या गरीब लोकांकरितां तुझे तारण पाठीव. संदीर बांध , आणि सदा सर्वकाळ राज्य कर; आणि तुझा प्रकाश संयोन डोंगरावर प्रकाशित कर. मग भुमीवरचे व धोक्यांत निजणर स्तवन करतल; आणि म्हणतील हे परमेश्वरा ! राज्यार्धकार तुझाच आहे. आमची विनंति मान्य करण्याकरितां द्वार उघड; आणि आम्हास हर्षांचा व आनंदाच स्वर ऐकीव , हैं परमेश्वराचे द्वार आहे, यांतून नीतिमान आंत जातील, व मला उत्तर दिलें आहे, तू माझे तारणहि झाला आहेस, म्हणून मी तुला स्तवीन. जो दगड बांधणारांनीं अव्हेरिला, तो कोपयाचा मुख्य झाला आहेहे परमेश्वराकडूनच घडले आहे, तें आमच्या दिसण्यांत आश्चर्य कर्मच आहे. जो दिवस परमेश्वरानें नेमिला आहे तो हाच आहे, त्यांत आम्ही हर्ष व आनंद करू. सर्वे वरील ( आकाशांतील ) व खालील ( प्रविवरील ) उत्पन्न केलेले पदार्थ एकत्र साक्ष देऊन कळवितात की, परमेश्वर एक आहे व त्याचे नामहि एकच आहे. तुझ्या क्रमणाचे बत्तीस मार्ग आहेत, त्यांचे मर्म ज्यांस समजतें, ते तुझ्य गौरवाचे वर्णन करतात व ते जाणितात कीं सर्व तुझेच आहेआणि तू एकटाच मात्र देव रजा आहेस. सृष्टीच्या रचनेविषयीं मन जेव्हां विचार करितें, तेव्हां त्यास कळून येतें कीं तेज वांचून सर्वे शुन्य आहे; सर्व तुजपाशीं गणलेले, व मापिलेले आहे; ते सर्व आम्हास एकाच मेंढपाळाने दलल आहे. प्रारंभापासून शेवट पर्यंत तुझाच शिक्का आहे ; उत्तर, पश्चिम, पूर्व व दक्षिण आणि आकाश व पृथ्वि हीं सर्व एक एके कडून व दुसरें दुसरे कडून तुजविषयीं साक्ष देणारे तुझे विश्वासू साक्षदिर आहेत.