पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/२५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत


विनत पणा घडू दे; आणि शास्त्रांतील आज्ञा व नेम पाळण्या करितां व आचरण्या करितां तू माझे दिवस सुखांत व माझ वर्षे आनंदांत वाढीव. माझ्या लेकरांनींहि सर्व क्राळच्या जीवंत देवाच्या प्रशांत चालावें ( असें तें कर ). आणि तुझ्या मोठ्या, थोर व भयंकर नामाच्या गौरवासाठी आमच्या उद्धाराचा वेळ लवकर जवळ आण सर्वकाळ, तथास्तु. सेलाह. उपद्धत • अनंता ! मी तुझा दरवाजा ठोकित; तेव्हां तो उघड; आणि हे अनंता; तुज पुढे मगणाय दरिद्रयास क्षमा कर. माझी प्रार्थना व माझे ओरडणें तुज पुढे येऊन नित्याच्या होमांतील मेंट एफाचा एक दशमांश सपीठ व पेयर्षण * यां बद्दल मान्य होवो. माझे डोळे प्रकाशित कर, मला प्रसन्न हो, आणि माझी जिव्हा सांभाळ; आणि जर मी तुजपुढे चूक केली, तर हे अनंता ! मला क्षमा कर. मी आपलें हृदय व आपले डोळे तुजकडे उंचावित, म्हणून तूही आपला कान लाऊन माझे एक व डोळे उघडून मजकडे पाहा माझी वाणी ऐक, आणि माझ्या ओरडण्याकडे कान लाव; आणि माझी प्रार्थना अर्पणाबद्दल मान्य करून घे. माझ्या वाणीचैओरडण्याचे व माझ्या म्हणण्याचे उत्तर दे; आणि दु:खांत पडलेल्या लोकांकडे आपले डोळे उघड. पाहा, माझा आमा मजमध्यें खेदित झाला आहे; आणि माझा जीव फार क्षीण होऊन नमला आहे. हे दयावंता व कृपावंता ! तुज पुढी आह्व पाप केले आहे; आम्हास क्षमा कर आणि आम्हा करितां मुक्ती पाठीव. आरीएलाच्या निभावलेल्यांवर दया व कृपा कर, आणि त्यांस सकटांतून काढून सुखांत आण. मग पूर्वकाळा पासून नेमून ठेविलेल्या पवित्र मंदिराच्या ठिकाणी आम्ही जाऊन तें आनंदानें पहुं. हे अनंता । त्यांस त्यांच्या देशांत ’ व त्यांच्या वस्तिस्थानांत वसीव व त्यांस शांतपणे व निर्भयपणें तेणें पडून राहू दे. = गणना अ० २८ ओ० १-८०

  • येरूशलेमेच्या.