पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

विनता आणि जे अपराध, ज उल्लंघनें व ज पणे मी तुज पुढे जाणून किंवा न जाणून केली असतील, ते अपराध, त उल्लंघने, तं पार्षे तू क्षमा व माफ कर व त्यांची सुटका कर. आणि आतां मज करितां ज्ञान, बुद्धि, शास्त्र व तुझ्या आज्ञा पाळण्याची व दया, कृपा, अनुग्रह, शांति, आरोग्यता, संपत्त, हुनर, सफलता, शुद्धता, दुर्गुणा पासून दूर राहणे, स्वच्छपणा, लाभ, विस्तार, विसावा व कल्याण यांचीं द्वारं व कवडे उघड. माझ्या कामांवर आशीर्वाद अस; माझे मागे सफल होवोत व माझ वचनं ऐकिल जावोतआणि हे देवा ! तुझ्या व मनुष्य मात्रांच्या दिसण्यांत मला कृपा व मान्यता मिळो. आणि त्या सर्वांना माझे सामर्थे दृढ करावें, परंतु दुःख देऊं नये; आणि परमेश्वराची सेवा करण्यांत जें कांही मला आड येणारेंआटकावण।रें व त्रास देणारं असेल, तं सवे व दारिद्रय, रोग, भय, खेद, विन्न, सर्व प्रकारची पटक, व दुखणीं मज पासून दूर होवोत. खरोखर मी विनंति व काकलूत करून प्रार्थना करितों की, मी व माझ्या संतानाने सकमी करण्यांत दृढ राहावे म्हणून आम्हस ज्ञान, सामथ्र्यं, द्रव्य, सन्मान व जीवन दिले जावो, आमेन. आणि मी तुझ्या गौरवाच्या आसना पुढे प्रार्थना करितों कीं, तू माझी आवड पूर्ण होऊ दे; आणि दुष्ट वासना, अनर्थक दृष्टी, अरिष्ट, वाईट वेळ, वाईट जिव्हा, पट की, तरवार, वाईट पशु, दुष्काळ, अपघात, वाईट मृत्यु, नकीची शिक्षा, अनदर, लज्जा व त्रपा यांपासून मला सोडीव; माझे मुख नीतीनें तेजस्वी, आणि ज्ञानानें लखलखीत होवो; माझे भय प्राणिमात्रावर असे; ( जेणें मी जाईन तेथे ) आंत जातानां व बाहेर येतानां सुकीर्ति मज बरोबर असो; शास्त्र माझ्या मनापासून पाळिलें जावो, माझ्या हातून स्थापित होवो, व माझ्या मुख पाठ असो. आणि या जग मल निदष करून पुढल्या जगा करितां माझ्या गुणांची सुधारणा कर. शात्राच्या विषयांमध्ये माझ्या गुर्द कमळांस दोन वाहात्या झच्या सारखे कर; गूढ ममें जाण ण्यास माझे डोळे व माझी बुद्धि प्रकाशित कर. माझा अभ्यास चालविण्यांत व शाखाभ्यास माझ्या इच्छे प्रमाणे व्हावा ह्यणून मला सहाय्य कर. मला जीवनाचा मार्ग सापडावा म्हणून मी काय करावें हैं मला शिकीव. मला चूका, अडथळे आणि खोट्या गोष्टी यां पासून सोडीच; आणि माझ्या हातून सरळपणा, सत्यता व खरे.