पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पहिल्या ग्रंथप्रकाशकाची प्रस्तावना. जरी आपले लोकांत बरेच ग्रंथ छापून प्रसिद्ध झाले आहेत; तरी त्या सर्वांपेक्षां 'तेफिलाथ हाहोदेश' ह्मणजे नित्याच्या प्रार्थनेचा ग्रंथ ज्यामध्ये प्रतीदिवशी करायास लागणाऱ्या विधीच अनेक नियम आहेत, त्याच्या भाषांतरचे अगत्य अधिक होते. असें वाटल्यावरून ते करण्याविषयी मी अ० मे० योसेफ येहेजकेल राजपुरकर यांस सूचना केली. ती त्यानी मान्य केल्यावरून, आणि ते मूळच्या इब्रीसहीत छापण्याचा खर्च मी आपणावर घेतल्यावरून, हा ग्रंथ माझ्या प्रीय बांधवांपुढे सादर करण्यांत आला आहे परंतु काढलेल्या आकारापेक्षा हा ग्रंथ सुमारे २०० पृष्ठे अधिक वाढल्यामुळे, आणि इनी व मराठी अक्षरे जुळण्याचे काम फारच बिकट असल्यामुळे, हा ग्रंथ तयार होण्यास अधिक दिवस लागले हे कारण सर्वांस मान्य होईल अशी मी आशा करितो. त्याप्रमाणे जरी केलेल्या आकारापेक्षां खर्चहि अधिक वाढला आहे, तरी हा ग्रंथ माझ्या बांधवांस आवडून त्यांकडून त्याचा यथायोग्य उपयोग झाला, झणजे मला अधिक उणा झालेल्या खर्चाचे सार्थक झाले असें मी समजेन. ईश कृपेनें जर ही सर्व पुस्तकें संपली तर ह्या आवृत्ती पेक्षा दुसरी आवृत्ती चांगली काढूं, येहेज्केल बिनयामीन पेणकर मुंबई ता० १५ माहे मे सन १८८९,