पान:Sanskruti1 cropped.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राम कैकेयीच्या महालातून निघाला, तो थेट कौसल्येकडे गेला. "देवी, तुला माहीत नाही. मोठी भयंकर आपत्ती कोसळली आहे. तुला, सीतेला व लक्ष्मणला दुःखात लोटणारी अशी ही गोष्ट आहे. महाराजांनी भरताला यौवराज्याभिषेक करावयाचे ठरविले आहे व मला वनवासात पाठविले आहे."हे शब्द ऐकिल्याबरोबरच कौसल्या बेशुद्ध झाली. रामाने तिला शुद्धीवर आणिले, तेव्हा तिने फार दुख केले. प्रसंग येण्यापेक्षा एक वेळ पुत्र न झालेला पतकरला. पतिपौरुषाने मला कसलेच सुख वा कल्याण दिले नाही. आता मुलामुळे सुख मिळेल, ही आशा होती. सवतींची (दशरथाला बखळ बायका होत्या.) मर्मच्छेदक बोलणी मला जन्मभर ऐकून घ्यावी लागली. तू जवळ असूनही माझी अवहेलनाच होत गेली. तू गेलास, म्हणजे माझं मरणच ओढवेल. आज जी चार माणसं माझ्यामागे आहेत, तीसुद्धा कैकेयीच्या पुत्रामुळे माझ्याकडे पाहीनातशी होतील. तू गेलास, तर मी मरेन व तू मातृमरणाला कारण झाल्यामुळे नरकात जोशील” (२.१८.२३-२८). अशी नाना त-हेची बोलणी ऐकून तिच्याइतकेच दुख झालेला लक्ष्मण म्हणाला,"रामाने वनात जावे, हे मलाही पटत नाही. राजा वृद्ध आहे विपरीत वागतो आहे; स्त्रीबुद्धीला वश आहे. शत्रुलासुद्धा रामात दोष सापडणार नाही. मी बघतो कोण आमच्या विरूद्ध जाऊ शकेल ते? सगळ्या भरतपक्षीयांना मी मारून टाकतो. तू स्वस्थ राहून पहा." कौसल्येने आशेने रामाकडे पाहिले; पण राम काही केल्या ऐकेना. "माझ्या बापाची आज्ञा (वाक्य) न पाळणारी अशी शक्ती नाही. मी तुझ्या पाया पडतो. मला वनात जाऊ दे. (परशु) रामाने बापाच्या सांगण्यावरून आईला मारिले; मग हे तर काहीच नव्हे. आपल्या कित्येक पूर्वजांनी अशाच शपथा घेऊन त्या पूर्ण केल्या. माझ्या प्राणांची आण! मला जाऊ दे. - लक्ष्मणा, तुझे प्रेम मला माहीत आहे. पण अधर्माने, अविचाराने वागू नकोस. भरताला अभिषेक होऊ दे. मी वनात गेल्याने कैकेयीला शांती लाभू दे." रामाची वचने ऐकून लक्ष्मणाचे समाधान झाले नाही. शेवटी रामाच्या इच्छेप्रमाणे कौसल्येने मंगल आशीर्वाद देऊन त्याची पाठवणी केली. त्यानेही जाताना आईला सांगितले की, "मी गेल्यावर राजा पुत्रशोकाने झुरेल. त्याला त्रास होऊ नये, असे वाग" (२.२१. १९). कौसल्येने तसे केले नाही. १८ । ।।संस्कृती ।।