पान:Sanskruti1 cropped.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

येथपर्यंतच्या विवेचनात बाईंच्या 'धर्म' या निबंधाविषयी मी काहीच मत दिले नाही. कारण बाईंचा शेवटचा हात न फिरलेला निबंध आहे. कित्येक वर्षांपूर्वी रा. ज. देशमुखांनी बाईंना 'धर्म' याविषयावर लिहिण्याची विनंती केली होती. आधुनिक युगात आधुनिक गरजा विचारात घेता धर्माचे स्वरूप नव्याने स्पष्ट करण्याची गरज आहे, असे देशमुखांना वाटत होते. बाईच्या मते नव्या युगात नवा धर्म देणे हे नव्या धर्मप्रवर्तकाचे काम आहे. समाजशास्त्रज्ञ 'धर्म' या कल्पनेचे स्पष्टीकरण करू शकतील, नवा धर्म देऊ शकणार नाहीत. असल्या प्रकारचे विचार मांडीत असताना बाईंनी मनात आले. तस धर्माविषयीचे विचार या. लेखात एकत्र मांडून ठेविलेले आहेत. हे विचार अंतिम. आराखड्यात त्यांनी काही प्रमाणात तपशिलाने वाढविले असत. काही प्रमाणात बदलून घेतले असते. आज जे आहे, ते बाईंच्या विचारांचे फक्त कच्चे टिपण आहे. या कच्च्या टिपणाचा विचार बाईंच्या मताची दिशा समजण्याच्या दृष्टीने करिता येईल, पण त्यांचे निर्णायक मत म्हणून कारता येणार नाही. या निबंधात बाईंनी मार्क्सवाद व कम्युनिस्ट यांच्यावर कार टीका केली आहे. हा भाग बाईंनी अंतिम स्वरूपात लिहिला असता, १ बदलला नसता. कम्युनिस्टांविषयीचा राग बाईंच्या मनात कायम होत आणि मार्क्सवादाविषयी अधिक चौकस भूमिका घेतल्याशिवाय हा । मावळणारा नव्हता. बाईंनी मार्क्सवादाचा व कम्युनिझमचा पूर्वग्रह दृष्टीने विचार केला असता असे वाटत नाही; कारण त्यांचे मा उदारमतवादा कक्षा ओलांडून पलीकडे जाण्यास तयार नव्हते. पण बाईंनी या निव असेही म्हटले आहे की, त्रिकालाबाधित, नित्य व अविनाशी असे एक ब्रह्म असते; त्यामुळे धर्म अपूर्ण, व्यावहारिक व सापेक्ष असा असतो. आ आराखड्यात बाईंनी हे मत शिल्लक ठेविले नसते. धर्म हा त्रिकालाबा अविनाशी ब्रह्माशी एकरूप होणे या पारलौकिक मूल्याच्या सिद्धीसाठी व्यवहा, कसे वागावे, हे सांगतो. धर्माचे लक्ष व्यावहारिक कल्याण नसते, आत म्हणजे पारलौकिक कल्याण हे असते. .. . इरावतीबाईंच्या वैचारिक निबंधांच्या या शेवटच्या संग्रहाच्या निमित्ता" त्यांच्या सगळ्याच चिंतनाचा हा एक धावता आढावा मी घेतलेला आहे. ' १८० लि रात ।। संस्कृती ।।