पान:Sahyadrichi Aart Haak Dr. Madhav Gadgil 22nd May 2023.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाताची लोंबी ह्या साऱ्या संदर्भात पश्चिम घाटाला आगळे महत्त्व आहे. भारतभूची भ्रमणगाथा राहतात, सह्याद्रीच्या ह्या खाशा जैविक वैभवाचे रहस्य भारतीय भूखंडाच्या कोट्यवधी वर्षांच्या इतिहासात आहे. पृथ्वीवरचे भूखंड चंचल आहेत. ते तुटत असतात, भटकत जोडले जातात. जेव्हा पंचेचाळीस कोटी वर्षांपूर्वी जीवसृष्टीने समुद्रातून डोके वर काढले, तेव्हा भारतभूमी दक्षिण गोलार्धात दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अंटार्क्टिकांना चिकटून होती. उत्तर गोलार्धातही एक प्रचंड खंड होते. या जमिनीवर जीवसृष्टी हळूहळू विकसित होत राहिली. प्रथम नेच्यांच्या भाईबंदांची, मग सूचिपर्णी वृक्षांची वने फोफावली. ह्या अन्नाचा फडशा पाडायला लागलीचच मोठ-मोठे पैसे, आणि त्यांच्या पाठोपाठ कीटक अवतरले. किड्यांना खायला बेडकांचे पूर्वज उद्भवले; पण निसर्गाचे रहाट गाडगे हळूहळू फिरते. त्यामुळे बेडकांचे पूर्वज अवतरायला तब्बल दहा कोटी वर्षे लागली. आणखी पाच कोटी वर्षांनी बेडकांना फस्त करणारे सापांचे पूर्वज उत्क्रांत झाले. नंतर दहा कोटी वर्षांनी चिचुंद्रीसारखे कीटक भक्षक छोटे छोटे सस्तन पशु अवतरले. ह्या वीस कोटी वर्षांपूर्वीच्या काळात परागीकरणासाठी वनस्पती वाऱ्या - पाण्यावरच अवलंबून होत्या. रंगीत फुलांचे, फुलपाखरांचे युग अजून भविष्यात होते. ह्या परिस्थितीत पंधरा कोटी वर्षांपूर्वी भारत दक्षिण गोलर्धातल्या प्रचंड खंडापासून फुटून हळूहळू उत्तरेकडे सरकू लागला. हे उत्तरायण तब्बल दहा कोटी वर्षे चालले. क्रमेण मादागास्कर बेटापासून भारतीय भूखंड तुटताना जमीन उचलली जाऊन सह्याद्रीची १८ सह्याद्रीची आर्त हाक!