पान:Sahyadrichi Aart Haak Dr. Madhav Gadgil 22nd May 2023.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रमाणावर दरडी कोसळून मोठी आर्थिक हानी होत आहे. आळस आणि कंत्राटदारांची तात्कालिक फायद्याची हाव यातून आपण देशाचे, आपल्या निसर्गाचे, निसर्गावर अजूनही निर्भर असलेल्या आपल्या बहुसंख्य जनतेचे प्रचंड नुकसान करत आहोत. गोव्यातील करमळीचे तळे आपली सार्वभौम जैवविविधता "राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन" असा निसर्गरम्य सह्याद्री दक्षिण भारताचा उदकनिधी आहे. इथून गोदावरी, कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी व वैगई सारख्या पूर्ववाहिन्या आणि वैतरणा, सावित्री, काळी, शरावती, नेत्रावती, भरतपुळा, पेरियार अशा अनेक पश्चिमवाहिनी नद्या उगम पावतात; पण ह्या पर्वतश्रेणीची खासियत आहे केवळ इथेच सापडणाऱ्या जीवजाती. यंदाच्या नवरात्रीच्या सुमुहूर्तावर जैवविविधता करारनाम्याची आंतरराष्ट्रीय बैठक भारतातच आयोजित केलेली आहे. वीस वर्षे राबत असलेल्या ह्या करारनाम्यानुसार केवळ भारतातच आढळणारे सर्व जीवजंतु, पशु-पक्षी, किडे-मकोडे, वृक्ष-वेली, पाळीव पशूंच्या, पिकांच्या वाणांची जनुकीय विविधता आपली सार्वभौम मालमत्ता मानलेली आहे आणि ह्याचे सर्वात मोठे भांडार पश्चिम घाटात आहे. भारतातल्या केवळ स्वकीय जीवजातींतला सर्वात मोठा हिस्सा, उत्तुंग हिमालयात नाही, तर आपल्या सह्याद्रीच्या पर्वतश्रेणीत आढळतो. सह्याद्रीची आर्त हाक!