पान:Sahyadrichi Aart Haak Dr. Madhav Gadgil 22nd May 2023.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आघाडीवर आणि आजच्या मंदीतही आर्थिक सुस्थितीत असलेल्या जर्मनीसारख्या देशात पर्यावरणाची खूप काळजी घेतच विकास चालू आहे. तेथे पर्यावरणवादी ग्रीन पार्टीचे अनेक सदस्य विधानसभांत निवडून आलेले आहेत, ते प्रभावीपणे काम करत आहेत. एवढेच की जर्मन उद्योजकांना उद्योगधंदे भरभराटीत ठेवण्यास अगदी पुरेसा, परंतु भारतातल्यासारखा वारेमाप नफा मिळत नाही; पण म्हणूनच जर्मनीत महागाई, सामाजिक विषमता एका मर्यादेत आहे. आपणही ह्याच विवेकपूर्ण मार्गाने पुढे जाणे उचित आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे! जोडीलाच भारतात निसर्ग संरक्षण करायचे असले तर त्यासाठी लोकांची हकालपट्टी केलीच पाहिजे, त्यांना अडचणीत टाकलेच पाहिजे असेही प्रतिपादन केले जाते; पण आजही मोठ्या प्रमाणात लोकांनी आपल्या परंपरांतून, स्वयंस्फूर्तीने निसर्ग सांभाळला आहे. देशभर अजूनही वड-पिंपळ-उंबर ही परिसराच्या दृष्टीने कळीची संसाधने तगून आहेत, देवराया टिकून आहेत. देशातल्या अनेक भागात माकडे-वानरे-मोर बागडत आहेत. काळवीट-चिंकारा - विशेषतः नीलगायींची संख्या अनेक ठिकाणी वाढली आहे. चिंकारा - काळवीटांची चोरटी तस्करी पकडून देण्यात स्थानिक लोक पुढाकार घेत आहेत. राजस्थानात अनेक भागांत लोक ओरण जंगले (राजस्थानातील आरवली डोंगरातील भिल्ल समाजाच्या देवराया) सांभाळून आहेत. नागालँडमध्ये स्थानिक समाज निसर्गरक्षणात पुढाकार घेत आहेत. उत्तराखंडातल्या वनपंचायती अनेक ठिकाणी चांगले १० सह्याद्रीची आर्त हाक!