380 पाकिस्तानचे संकट कल्पना या बरोबर होत्या कीं चूक होत्या या वितंडवादांत वेळ घालविण्याला हिंदुसंघटनवाद्याने प्रवत्त होऊ नये. देशकालवर्तमान पाहन या श्रेष्ठकनिष्ठ पणाच्या कल्पनेला तिलांजलि दिली पाहिजे एवढी एकच गोष्ट त्याने ओळखली म्हणजे झाले. जन्मसिद्ध श्रेष्ठपणा, जन्मसिद्ध कनिष्ठपणा, मानीव कनिष्ठपणांतुन श्रेष्ठपणाप्रत विकसित होत जाण्याची शक्याशक्यता, या संबंधीचे पांडित्यपूर्ण वाद पंडित अगर पंडितंमन्य खुशाल घालोत; हिंदुसंघटनवाद्यांनी करमणूक म्हणूनहि तिकडे वळण्याचे कारण नाहीं. हिंदुसंघटनवाद्याने एकच मद्दा मनांत वागविला पाहिजे व कृतींत उतरविला पाहिजे. परदास्यांत पिचत पडलेल्या मानवसमाजांत चातुर्वर्ण्यव्यवस्थेचा लोप परिस्थितीमुळेच झालेला असतो हे सत्य, सभों वतालच्या परिस्थितीकडे सूक्ष्म नजरेने पाहून,त्याने स्वतः पटवून • घेतले पाहिजे व इतरांना पटवून दिले पाहिजे. आज हिंदुसमाजांत चातुर्वर्ण्य आहे कोठे ? वेदोनारायणांनी, शास्त्रीपंडि-तांनीं अगर आचार्य महाचार्यानी खुशाल समजावें कीं, त्यांच्या ठिकाणी -ब्राह्मण्य नांदत आहे. पण; वास्तविक पाहतां ब्राह्मण्य त्यांच्या ठिकाणी नांदत नाहीं ! विद्येत व विचारांत त्यांना केव्हांच मागे टाकून पुढे गेलेले जे परदेशस्थ पंडित आहेत, परदेशस्थ तत्त्ववेत्ते आहेत, परदेशस्थ संशोधक आहेत, परदेशस्थ मुत्सद्दी आहेत आणि परदेशस्थ द्रष्टे आहेत ते आजच्या जगांतील खरे ब्राह्मण आहेत. परदास्यामुळे उभा हिंदुसमाज आज निर्बाह्मण, निःक्षत्रिय व. निर्वैश्य बनला असून, सारा हिंदुसमाज साम्राज्याच्या भार- वाहकाचे काम करणारा शूद्र बनला आहे. चातुर्वण्र्य शिल्लकच । नाहीं तर ते जुनें चातुर्वर्ण्य टिकणार कसे आणि ते जुनें चातुर्वर्ण्य - टिकविण्याची धडपड तरी कशाला ? अशा या अवनत काळींहि एक नवें चातुर्वर्ण्य निर्माण होत आहे. नि:स्वार्थीपणाने राष्ट्राच्या भवितव्याची चिंता वाहणारे जे जे राष्ट्रधुरीण या देशांत होऊन गेले आहेत व सुदैवाने आजहि हयांत आहेत ते सर्व या नव्या वर्णव्यवस्थेच्या दृष्टीने ब्राह्मणच आहेत. त्यांचा जन्म कोणत्या जातींतल्या
पान:Ranade dic 1 to 10.pdf/229
Appearance