मुसलमानांच्या हृदयपालटाची जरुरी 868 868 ससे त्यांनी म्हटलें नाहीं हे त्यांचे औदार्य होय. हे औदार्य मुसलमानांनी मान्य केले पाहिजे. संख्यादैन्यामुळे संरक्षणार्हच जर कोणी असतील तर ते अहिंदु नसून हिंदूच आहेत; कारण, अहिंदूंचीच वृत्ति आक्रमणशील आहे. ही इतिहाससिद्ध गोष्ट मान्य करून, वायव्य सरहद्दीनजीकच्या मुसलमानांनी तेथील हिंदु व शीख यांच्या संयुक्त समूहाला भरपूर संरक्षण देण्याची तयारी दाखविली पाहिजे. सध्यांच्या प्रांतरचनेच्या दृष्टीने प्रांतांपुरता हा प्रश्न सुटल्यानंतर, मुसलमानांनी आपल्यांतील हृदय-पालटाचे आणखी एक चिन्ह म्हणून असे कबूल केले पाहिजे की, मध्यवर्त-सत्तेच्या उपभोगाच्या वेळी संरक्षण देण्याघेण्याचा प्रश्न शिल्लकच उरत नाहीं. धार्मिक आचारस्वातंत्र्य वगैरे गोष्टींसाठी संरक्षण इष्ट व अवश्य असेल तर, ते संरक्षण प्रांतांच्या कक्षेपुरतेच मर्यादित आहे. मध्यर्वात कारभाराशीं या प्रश्नांचा अर्थाअर्थी कांहींहि संबंध नाहीं . ही गोष्ट प्रांजलपणे मान्य करून, मध्यर्वात विधिमंडळाच्या निवडणुकीपासून प्रत्येक बाबतींत मुसलमानांनीं व इतर अहंदूंनी हिंदूंशीं संयुक्त रीत्या व्यवहार कर ण्याला तयार झाले पाहिजे. हृदयपालट झाल्याचे लक्षण म्हणून मुसलमान या गोष्टी करतील तर, ब्रिटिश : हिंदुस्थानपुरता प्रश्न पुष्कळच लौकर सुटेल आणि तो सुटण्याच्या मार्गाला भागाला लागला की, संस्थानिक, त्यांची प्रजा व त्या उभयतांचे भारतीय सरकारशीं संबंध हेहि प्रश्न सहज सुटतील. | हृदयपालट झाल्याची एक खूण म्हणून मुसलमानांनी ही गोष्ट तर केलीच पाहिजे. पण, एवढीच गोष्ट केल्याने हिंदूंच्या साशंकवृत्तीचे पूर्ण समाधान ६९५८ होणार नाहीं. १९२१च्या मलबारमधील मोपल्यांच्या बंडापासून अगदी ताज्या असलेल्या डाक्का वगैरे ठिकाणच्या अस्वस्थतेपर्यंत जे हिंदुविघातक । प्रकार सतत घडत आलेले आहेत त्या प्रकारांचा मुसलमानांनीं साधा शाब्दिक ; निषेधहि केलेला नाही. आपल्या चित्तवृत्तींत दिसू लागलेला पालट संधिसाधुपणाचा नसून तो मनाच्या तळमळींतून निघालेला आहे हे हिंदूंना पटवून देण्यासाठी 12 .
पान:Ranade dic 1 to 10.pdf/200
Appearance