राष्ट्ररक्षण व शांततारक्षण 804 पाकिस्तान मिळावयाचें कीं नाहीं हा प्रश्न ऐकटयादुकट्या कारणाचा अगर घुटनेचा विचार करून सुटण्यासारखा नाहीं ! तो कोणीहि व कसाहि सोडवं घाहील तर, आपल्या इच्छाशक्तीचा जबरदस्त अडसर घालून, हिंदु कांहीं प्रतिकार करू शकतील की काय एवढ्याच प्रश्नाचा विचार करणे हिंदूंच्या हातचे आहे. . . हिंदुस्थान आजच्या परिस्थितीत आहे तसाच अखंड राहिला तर त्याला सुरक्षित सरहद्दीचा नैसर्गिक फायदा पुढेहि मिळू शकेल. हिंदूंनी पाकिस्तान मान्य केले आणि सध्यांची सरहद्द पाकिस्तानवाल्यांच्या हातांत गेली तरी फारसे बिघडत नाही, असे मत डॉ० आंबेडकर यांनी प्रतिपादिले आहे. हे मत अत्यंत धाडसाचे आहे. आज सरहद्दीपलीकडे नुसत्या पठाणांच्या टोळ्या आहेत तर त्या टोळ्यांचा त्रस्त समंध शांत राहावा म्हणून सरकारला केवढा खटाटोप व केवढा खर्च करावा लागत आहे ! हे टोळीवाळे पठाण आणि सिंध, पंजाबमधील मुसलमान, सगळे एक झाले तर त्या बाजूने हिंदुस्थानवर केवढे संकट येईल आणि हे संकट हिंदुस्थानला एकसारखें भेडसावीत क़से राहील याची कल्पना डॉ. आंबेडकरांना झाली नाही, हे मोठे आश्चर्य आहे ! नव्या हिंदुस्थानची सरहद्द थेट गुजराथपासून संयुक्तप्रांत काश्मीरपर्यंत पसरलेली राहील. इराण, अफ़गाणिस्थान या वाटेने या घातक सरहद्दीपर्यंत हवे तेवढे लढाऊ मनुष्यबळ व युद्धसाहित्य येऊ शकेल. पूर्वेच्या बाजूला बंगालमध्ये जे मुसलमानी राज्य निर्माण होईल त्या राज्यांत समुद्रमार्गाने व ब्रह्मदेशच्या मार्गाने हव्या तेवढ्या उपद्रवी वस्तु आणि हवी तेवढी उपद्रव माणसे येऊ शकतील. . मध्यप्रांत, मुंबई इलाखा, मद्रास इलाखा व ओरिसा प्रांत यांना स्पर्श करणारें हैद्राबाद संस्थान किती तापदायक ठरेल हेहि कल्पनेला समजण्यासारखे आहे. पाकिस्तान मान्य केल्याने नुसती नैसगिक सुरक्षित सरहद्द सुटते इतकेच नसून, अनेक सरहद्दी व आजच्याहून व्यापक अशा सरहद्दी धोक्याच्या बनतात. आणि खुद्द हिंदुस्थानच्या काळजांत एक विषारी कांटा ऋतन राहतो! अशा परिस्थितन, निसर्गाने दिलेली व आज शतकानशतकें सिद्ध झालेली नैसगिक सरहद्द हिदंनी स्वेच्छेने का सोडावी हे समजणे अवघड आहे. सुरक्षित सरहद्द पाहिजे कीं विश्वासार्ह मैन्य पाहिजे असा बेमालूम प्रश्न डॉ. आंबेडकरांनीं. हिंदूंना विचारला आहे. हिंदूंचे या प्रश्नाला
पान:Ranade dic 1 to 10.pdf/186
Appearance