$38 पाकिस्तानचे संकट असे म्हणतात की, हिंदुस्थान हीच ज्यांची पितृभू व पुण्यभू आहे अशा तीस कोटी हिंदूचे हिंदुस्थानांत राष्ट्र आहे व या राष्ट्राचे सारें भवितव्य या देशाच्या स्वातंत्र्यांशीं व सुरक्षिततेशी निगडित झाले असल्यामुळे, ते राष्ट्र एकाकीहि स्वातंत्र्यार्थ झगडेल. इतर लोक येतील तर हिंदु त्यांच्या मदतीचा स्वीकार करून झगडतील; न येतील व स्वस्थ बसतील तर एकटे हिंदू झगडा चालवितील आणि विरोध करतील तर त्याहि विरोधाला तोंड देऊन हिंदु आपले ध्येय गांठतील; मदतीचा मोबदला म्हणून अहिंदूनी अवास्तव असे कांहीं अपेक्षं अंगर मागू नये, ते त्यांना मिळणार नाहीं-हा या विचारसरणींतला आशय आहे. हिंदी मुसलमान हे स्वतंत्र राष्ट्र' आहेत असे वै० सावरकरांचे अगर हिंदुसभेचे मत आहे, असे अधिकृतरीत्या बाहेर आलेले नाहीं. ' पण, बॅ० सावरकरांचे मत कांहींहि असले तरी डॉ० आंबेडकरांवर ते बंधनकारक नाहीं ! या द्विराष्ट्रवादाची चर्चा करतांना त्यांनी पुष्कळ ग्रंथकारांचीं अवतरणे दिली आहेत (पृ० २५-३३). या अवतरणांच्या आधारें डॉ. आंबेडकरांच्या विवेचनाचा विचार केला तर असे दिसते की, वंश, भाषा, परंपरा, संस्कृति इत्यादि गोष्टींचा विचार केला तर हिंदूंचेहि एक राष्ट्र ठरत नाहीं वे मुसलमानांचेंहि एक राष्ट्र ठरत नाहीं. मुसलमान हे तर परवांपरवांपर्यंत स्वतःचे वर्णन जमात, समाज, अल्पसंख्य वर्ग वगैरे शब्दांनी करीत होते, या गोष्टीची जाणीव डॉ० आंबेडकरांनाहि आहे (90 38-32). ऊर्दू ही मुसलमानांची राष्ट्रभाषा आहे, इतकेच नव्हे तर, ती उभ्या हिंदुस्थानचीच राष्ट्रभाषा आहे या मुसलमानांच्या फ्रेंचारांत शुद्ध झडपणा कसा भरलेला आहे हें डॉ० आबेडकर यांनीच दर्शविलें आहे (पृ० २६२). हिंदूची एकजूट होत आहे व आपल्याला एकराष्ट्र म्हणून नांदले पाहिजे ही भावना हिंदु समाजांत वाढत आहे, हे डॉ०आंबेडकरांनाहि मान्य आहे(पृ०६), : स्वतःच गोळा केलेल्या पुराव्याच्या आधारें डॉ आंबेडकर यांनी वस्तुतः असे म्हणावयाला पाहिजे होते की, हिंदुस्थानांत स्वतंत्र इस्लाम सष्ट्र असल्याची भाषा साफ खोटी व अनैतिहासिक आहे. हिंदूचे स्वतंछ राष्ट्र असल्याची कबुली त्यांना त्यांच्या पुराव्यावरून देतां आली नसती तरी,
पान:Ranade dic 1 to 10.pdf/147
Appearance