87 पाकिस्तानचे संकट पाकिस्तान मागणीचे प्रच्छन्नपणे समर्थन करणा-या डॉ० आंबेडकर यांच्या | सारख्या गहस्थांना आणखीहि एक प्रश्न विचारतां येण्यासारखा आहे. ओरिसा, बिहार, आसाम वगैरे जे प्रांत अलीकडे स्वायत्त प्रांत म्हणून नांदू लागले आहेत त्यांनीं, अगर कर्नाटक, आंध्रप्रभृति जे प्रांत स्वायत्त व स्वतंत्र होऊ पाहात आहेत त्यांनीं अखिल भारतीय मध्यर्वात सरकारच नको असे कधी म्हटलें अगर सुचविलें आहे की काय, हाच तो प्रश्न होय. या प्रांतांनीं असे विचार व्यक्त केले असल्याचे जोंवर सिद्ध होत नाहीं तोंवर काँग्रेसच्या अगर हिंदूमहासभेच्या भाषावार प्रांतरचनेचा आधार पाकिस्तानच्या मागणीला पोषक म्हणून घेता येईल, असे वाटत नाहीं. to | कूर्ग, अंदमान-निकोबार बेटे वगैरे किरकोळ भाग हिंदुस्थानचे राजकीय घटक म्हणून हिंदुस्थानांत अंतर्भूत झालेले असले तरी, प्रस्तुत विचाराच्या दृष्टीने ते फारसे महत्त्वाचे नाहींत. पाकिस्तानची मागणी संमत केली गेली अगर हिंदूंची संमति नसतांना सरकारकडून ती मागणी पुरविली गेली तर, हिंदूंना केवढ्या क्षेत्रफळाला मुकावे लागते, या क्षेत्रफळाचे आर्थिक व औद्योगिक महत्त्व काय, हे क्षेत्रफळ हातचे गेल्याने हिंदुस्थानच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर कांहीं परिणाम होतात की काय वगैरे गोष्टींचाच विचार प्रस्तुत असल्यामुळे, अकरा स्वायत्त प्रांत, बलुचिस्थान व संस्थानी हद्दीतला हिंदुस्थान एवढ्यासंबधींचाच विचार कर्तव्य आहे. १. मद्रास | अकरा स्वायत्त प्रांतांपैकीं मद्रास इलाखा हा एक महत्त्वाचा प्रांत आहे. १९ व्या शतकाच्या आरंभापासून या प्रांताची जी रचना चालत आली आहे तिच्यांत आजपर्यंत म्हणण्यासारखा फरक झालेला नाही. या इलाख्याचे क्षेत्रफळ १,४२,२७७ चौरस मैल असून १९३१च्या शिरगणतीप्रमाणे त्याची लोकसंख्या ४,६७,४०,१०७ आहे. यांत मुसलमान ३३,०५,९३७ म्हणजे शेकडा ६२ आहेत. या लोकसंख्येत सर्व हिंदूंची एकुणात ३।।। कोटी असून त्यांत दलित हिंदु ६० लक्ष आहेत. या इलाख्यांत ख्रिस्त्यांची लोकसंख्या १५ लक्षांच्या आसपास आहे. हिंदी स्त्यिांची सगळ्या हिंदुस्थानांतील लोकसंख्या १९२१च्या शिरगणतीप्रमाणे ४५ लक्ष आहे. या लोकसंख्येतली
पान:Ranade dic 1 to 10.pdf/103
Appearance