पान:Paripurti.pdf/86

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


परिपूर्ती / ९९
 

विव्हळ होतात. पूर्वी अनुभवलेले दु:ख हे सुखाच्या क्षणी सुखकारक व्हावे- दु:ख झालेच तर आजच्या क्षणाची सुखानुभूती वाढवण्यापुरते व्हावे- पण ह्या अंकात तसे न होता रामाचा शोक व मन:संताप वाढतच जातो- वाचणाराचेही मन जड होते. लवकरच होणाऱ्या अतिदुःखदायी व शोककारक घटनांची त्या प्रसंगावर छाया पडलेली आहे. खरे म्हटले म्हणजे सीतारामांनी आयुष्यातील आत्यंतिक सुखाचे शिखर ह्या अंकात गाठलेले आहे... पण अंकातील वातावरण आनंदाने फुलत नाही. ह्याचे कारण ह्या अकात सीता-रामाच्या वर्तमानाच्या संवेदना भूत व भविष्याशी निगडीत झालेल्या आहेत व त्यांच्या सावल्यांनी सुखाचे क्षण झाकळून टाकले आहेत.
 ही त्रिकालसंवेदना फक्त कलावंतांना होते, इतरांना नाही, असे मुळीच नाही. सर्वांना ती असते- मला वाटते काही परिस्थितीत पशूनासुद्धा ही सवदना होते. कालाची संवेदना त्रिपरिमाणात्मक असल्यामुळे एका क्षणात मागचा व पुढचा क्षणही सामावलेले असतात. वोल्फगांग कोलरने काही पानराच निरीक्षण केले. त्यात पुढील हकीकत सांगितली आहे. चिंपाझी वानरांच्या एका पिंजऱ्यातच हात पुरणार नाही व उडी मारूनही हाती गणार नाही इतक्या उंच एक केळ्यांचा घड टांगला होता. एकात एक असतील असे पोकळ वाशांचे तुकडेही पिंजऱ्यात होते. वानराने पहिल्याने हात लाब करून, नंतर निरनिराळ्या लांबीचे वाशांचे तुकडे हातात घेऊन, कळ्यापर्यंत पोहोचता येते का ते पाहिले. व शेवटी निराश होऊन ते खाली बसले. काहीतरी चाळा म्हणून ते त्या वाशाच्या तुकड्याशी खेळत होते. ळता खेळात सहज गमतीने एका वाशाचे टोक त्याने दुसऱ्यात बसवले. ही पा होताक्षणीच वानर तात्काळ उडी मारून उठले, व आता लांब सालल्या काठीने त्याने ताबडतोब केळ्यांचा घड हस्तगत केला. ज्या शाला काठ्या एकात एक सांधल्या गेल्या त्याच क्षणाला वानराच्या मनात व्याचा घडही हस्तगत झाला होता- भविष्यात होणाऱ्या क्रियेची जाणीव " पूर्णतया झाली होती. फक्त क्रिया घडण्यास वेळ लागला इतकेच. सर्व क्रयच्या बुडाशी त्रिकालपरिमाण असलेल्या कालाची संवेदना असतेच. मा एक पाय भूतात रोविलेला असतो तर एक पाय पुढच्या क्षणातं टाकलेला असतो.