पान:Paripurti.pdf/59

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


६८ परिपूर्ती
 

एक प्रकारचा एकेरीपणा असतो, आणि ऐकणाराच्या कानाला कशा झिणझिण्या येतात. तेच एखाददोन पुरुष घरी असले म्हणजे त्यांचे साधे बोलणेच नादाने इतके भरलेले असते की घर भरल्यासारखे वाटते. सगळा आवाज मन्द्र आणि मध्य पट्टीत असल्यामुळे त्यात तीक्ष्णपणा किंवा एकेरीपणा येत नाही आणि पुरुष जर रागाने अस्सल प्राकृतात शिव्या देणारे असले तर ढगाच्या गडगडण्याप्रमाणे घर दणाणून टाकतात. माझ्या मैत्रिणीच्या घरी बायाच पुष्कळ भेटावयास यावयाच्या, आणि त्याच बोलणे-हसणे कसे सगळेच नाजूक होते. पुरुष आले तरी थोडा वेळ बसून चार औपचारिक गोष्टी बोलून निघून जायचे. पण अप्पासाहेब- तिच यजमान- घरी आले म्हणजे पुढच्या दालनातील बैठक रंगत असे. सर्वांचेच मोठ्याने बोलणे, हसण्याचा गडगडाट, घरात बसून रस्त्यावरून कोणी मित्र गेला की, त्याला मोठ्याने हाका मारणे- दिवसातून दहा वेळा पानासाठी गड्याला चौरस्त्यावर पिटाळणे, घरात जण एखादे कार्य चालल्याची गडबड असायची.
 गडीमाणसांच्या वागण्यातही फरक दिसून यायचा. जेवायला बसले की कोणी तरी कुरकुरत म्हणावयाची, “काय करावं बाई, ह्या सदाशिवाला दहादा सांगितलं तरी कधी वेळेवर येत नाही.' दुसरीने सूर काढायचा, "आणि कुठं कामाला गेला म्हणजे तास-तास परत येत नाही." माझा मैत्रीण मग अगदी गंभीर चेहरा करायची व हाक मारायची. “सदाशिव! ए सदाशिव!" सदाशिव असा हाकेसरसा थोडाच येणार? तो चांगली पाच मिनिटे झाल्यावर एकदाचा आला की रागाचा पारा उतरलेला असायचा, आणि “उद्यापासून वेळेवर ये बरं का!' अशी अगदी मिळमिळीत ताकीद त्याला मिळायची, व पुनश्च दुसऱ्या दिवशी सर्व प्रकार मागील प्रकरणावरून पढे चालू व्हावयाचा. बया मोलकरीण तर काय, स्त्रीच. त्यातून विधवा. बाईंच्या हृदयाची किल्ली तिने कधीच काबीज केली होती. ती रोज उाश यायची, कधी तर यायचीच नाही; आणि कोणी करकुर करायच्या आतच बाईंपुढे जाऊन, “काय करावं? पोराला ताप आला..." आज काय. "लेकीला नवऱ्यानं मारलं...", उद्या काय, “दीर फाडफाड बोलला..." असे अगदी आसू पुशीत-पुशीत सांगावे; की बाईंनी म्हणावे, “बरं बर, बया, लाग कामाला- जाताना पोराला औषध घेऊन जरा रोजच्यापक्षा लवकरच जाहो." एखाद्या गड्याने फारच आगळीक केली तर त्याला