पान:Paripurti.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०
स्त्रीराज्य

दोन-चार तासांतच मला कळून चुकले की,

मी एका स्त्रीराज्यात आले आहे म्हणून. हे कुटुंब
सध्या तरी फक्त स्त्रियांचेच होते. सर्व जाणती
माणसे बाया होती व निरनिराळ्या वयांचे म्हणजे
१५ वर्षे ते एका महिन्यापर्यंतचे मुलगे घरात होते.
माझ्या मैत्रिणीचे यजमान परगावी नोकरीला होते.
घरी माझी मैत्रीण व तिच्या दोन वन्सं असत आणि
ह्याच सुमारास तिची धाकटी बहीण
बाळंतपणासाठी आली होती. लेकीचे करायला
म्हणून तिची आई आली होती व चार दिवस
हवापालट म्हणून आईची आई पण आली होती.
 घरात घडणा-या लहानसहान गोष्टींतही
पुरुषमाणूस नसले म्हणजे किती फरक दिसून येतो!
सारा दिवस कानावर मध्यसप्तकाच्या मध्यमापासून
तो तारसप्तकाच्या पंचमापर्यंत सूर
आदळत असतात. संभाषण जोपर्यंत गोडीत
चालले असते तोपर्यंत मधूनमधून हसणे आणि
किनच्या (thin) आवाजातले अस्पष्ट बोल
कानाला गोड वाटतात- तेच रागावून किंवा
त्रासून बोलणे चालले तर आवाज एकदम
तारसप्तकात जातो- आवाजात कंप वाढतो

तीक्ष्णपणा येतो, पण तो मोठा येत नाही- त्यात