पान:Paripurti.pdf/48

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


एकेश्वरी पंथाचा विजय

'भावोजी मला नेहमीच सनातनी व

बुरसटलेली म्हणतात. पहिल्याने मला त्याचा राग
येई, मग-मग गम्मत वाटे, पण आज मात्र
जुनेपणाची जाणीव मला तीव्रतेने होते आहे.
आज माझे मलाच कळते आहे की, मी गतिमान
(dynamic) तर नाहीच नाही, पण नुसती
स्थितीमान (static)सुद्धा नाही, तर सर्वस्वी
प्रतिगामी आहे. जुन्या नाहीशा झालेल्या किंवा
मरू घातलेल्या गोष्टीबद्दल मला आज किती
वाईट वाटत आहे! माझ्या भोवतालच्या
सुशिक्षित जाणत्या लोकांना काही नाहीसे झाले
ह्याची जाणीवसुद्धा नाही, आणि मी मात्र गेलेल्या
मूल्याबद्दल अश्रू ढाळीत आहे.
 नुकतेच वर्तमानपत्रात वाचले की,
हिंदुस्थानातील लिबरल (नेमस्त, मवाळ) पक्ष
राजकीय पक्ष म्हणून स्वत:ला बरखास्त करून
टाकणार आहे." किती क्षुद्र बातमी! कोणी
म्हणाले, “म्हणजे ह्या नावाचा राजकीय पक्ष
होता तर?" कोणी म्हणाले, “नाहीतरी मेलेलाच
पक्ष होता, आता काय बरखास्त होण्याचे राहिले
होते?" मला मात्र कशी हुरहूर लागून राहिली

आहे! मी माझ्या मनाला विचारते आहे की,