पान:Paripurti.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४० / परिपूर्ती
 

वीरमूर्ती तिच्या डोळ्यांपुढे आली. विचित्रवीर्यासारख्या रोगी नाजूक पुरुषाशी लग्न लागले त्या वेळचा मनोभंग. मनातील सुप्त आशा व आता ती पूर्ण होईल का? अशी सोत्कंठ हुरहूर.... नंतर लगेच त्याची ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा तिला आठवली असावी- छे:! तो कसचा येतो? - मग कोण बर? म्हणून कौरवांच्या दरबारातील इतर वीरकौरवांच्या मूर्ती ती आठवते.)
 "ततो अम्बिकायां प्रथमं नियुक्तः सत्यवाग ऋषिः।।
 दीप्यमानेषु दीपेषु शयनं प्रविवेश ह।।”
 “नंतर अंबिकेसाठी योजलेला सत्यवाक ऋषी दिव्यांनी उजळलेल्या त्या शय्यागृहात आला."
 (शय्यागारात व अंबिकेच्या सोत्कंठ हृदयांत आशेचे दीप पाजळले होते.)
 "तस्य कृष्णस्य कपिला जटा दीप्ते च लोचने।
 ब्रभ्रूणि चैव श्मश्रूणि ष्टवा देवी न्यमीलयत।।"
 "त्या काळ्या पुरुषाच्या तांबड्या जटा, अंगारासारखे डोळे व पिगट मिशा पाहून देवी अंधारली."
 (न्यमीलयत= निमिमील। (कालिदासः रघुवंश; आठवा सो "निमिमील नरोत्तमप्रिया हृच्चन्द्रा तमसेव कौमुदी।" “चन्द्र गेल्याने का जशी अंधारात विलीन होते तशी चैतन्याने स्फुरणारी राणी काळोखला मेली.") अंबिकेचे शय्यागृह व हृदय तसेच आशेने पाजळले होते- ld शरीर राहिले, पण हृदयाचे- आशेचे- कोळसे झाले.)
 आणि अजून माझे मन त्या अभागी जीवाच्या या भयंकर विटबनेने बधिर होते. ही बीजक्षेत्रन्यायाची विटंबना आहे, ‘दीर' शब्दाची विटंबना आहे, ही एका कोळ्याच्या पोरीने क्षत्रिय कुळाची केलेली विटंबना आहे, की-की भीष्माने आपल्या महत्त्वाकांक्षी, शीलभ्रष्ट सावत्र आईवर उगवलेला भयंकर सूड आहे?