पान:Paripurti.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६ / परिपूर्ती
 

भिंतीवर डोकं आपटलं. मग सासूबाई खूप बोलल्या व त्यांनी मारलं." मैनेने खालच्या मानेने सांगितले. “अग, पण तू त्याची आई. तुला नाही का त्याची काळजी? सांगावं असं सासूबाईंना.' मैनेची मान वरती झाली, तिचे डोळे चमकले. भुवया रागाने आकुंचित झाल्या. तिने रुद्ध स्वरात उत्तर दिले, "मी तसं सासूबाईंना सांगितलं, तर त्या म्हणाल्या, “चूप-चूप, किती तोड करतेस? म्हणे आई! तू त्याला सांभाळणारी दाई आहेस दाई! म्हणे ‘पोसल माझ्या पोराला!' कुठचा तुझा पोर? तुझ्या कुणग्यात तो पोसला. कुळाच बीज रक्षण करायला दिलं. तुला खायला घातलं त्या अन्नावर तो पोसला. पहिल्यांदा आत पोसलास, आता बाहेर पोसतेस... दाई ती दाई, आणि वर मिजास पाहा!' पडल्या-पडल्याच मी तिच्या पाठीवरून हात फिरवून तिला शात केले. पण मनाच्या त्या त्रस्त परिस्थितीतही मला आठवण हा क्षणभर हसू लोटले.
 "भस्त्रा माता पितुः पुत्रः येन जातः स एव सः।
 भरस्व पुत्रं दुष्यन्त मावमंस्थाः शकुन्तःलम्।।"
 "आई केवळ चामड्याची पिशवी आहे. मुलगा बापाचाच. बापच त्याच्या रूपे जन्म घेतो. हे दृष्यंत राजा, मलाला सांभाळ, शकुतलेचा धिक्कार करू नकोस."
 मैनाच्या सासूबाई आणि दुष्यंतराजा ह्यांच्यात किती बर अंतर. असेल. तीन-चार हजार वर्षांचे. पण हा चार हजार वर्षांच्या कालदरीने विभागलेले हे दोन जीव एकाच संस्कतीने कसे अगदी जवळ बाव होते!
 हाच तो बीजक्षेत्रन्याय. पण त्याचा उपयोग मात्र दुधारी शस्त्रासारख दुहेरी होई. दुष्यंताच्या परिस्थितीत जेव्हा एखाद्या स्त्रीशी लग्न झाल्याचा पुरावा देता येत नसेल- किंबहना लग्न झाले नसेल- तेव्हा ज्याचे बीज त्याचे संतान असा युक्तिवाद लढवून मुलावर हक्क सांगायचा आणि जेव्हा पुत्रोत्पत्तीची शक्ती नसेल तेव्हा क्षेत्रावर हक्क सांगून जे उगवेल ते शेताच्या धन्याचे म्हणून त्यावर हक्क सांगायचा व बऱ्यावाईट मार्गाने संतती मिळवायची असा पूर्वीचा राजमार्ग होता.
 मातृत्व ही एक नैसर्गिक घटना आहे. पितृत्व हा एक सामाजिक संकेत आहे आणि समाजात नैसर्गिक घटनांपेक्षा सामाजिक संकेतानाच जास्त प्राधान्य असते - इतकेच नाही तर नैसर्गिक घटनांचा उपयोग सामाजिक