पान:Paripurti.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


स्त्री-व-संस्कृती

काही वर्षांपूर्वीची गोष्ट मी थोडे दिवस

वाईला राहिले होते. त्याच वाड्यात मराठ्याचे
एक तरुण जोडपे होते. नवरा उत्तमपैकी गवंडी
होता, व बायको-एक-दोन घरी मोलमजुरी करी.
दोघेही देखणी, हसतमुख, नेहमी ठाकठीक
पोशाक केलेली अशी असायची. मी ज्यांच्या
घरी राहिले होते. त्यांना म्हदले,"कसा जोड़ा
छान आहे,नाही?" वयस्क गृहस्थ व त्यांच्या
पत्नी दोघेही एकदम म्हणाले अहो, दिसायला
छान असून काय उपयोग? तो माणूस फार निर्दय
आहे. महिना-पंधरवड्यात एकदा तरी बायकोला
मारतो.' मी म्हटले, “ती तर चांगली आनंदी
आणि अंगा-पिंडाने गुटगुटीत दिसते. तिला
माराचं काही फारसं वाटेत नाहीसं दिसतं,"
छे:! छे!काका मान हलवून म्हणाले,हे।
तुमचे उदगार फारच अनुदार आहेत. तिला म्हणे
माराचं काही वाटत नाही! जणू-कोयं ही रीतच
आहे नवरा-बायकोची' मी ताबडतोब उत्तरले,
"हे पाहो: आपण पुढचे चार दिवस तालुक्यात
हिंडणार आहोताना,तर मी माझं काम करीन
आणि तुम्ही भेटेल त्या शेतकऱ्याला तो

बायकोला कधी मारतो का नाही ते विचारा,"