पान:Paripurti.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
20 / परिपूर्ती
 

पण आमचे सामान मात्र डोंगराएवढे होते. आमची कामकरी माणसे गेल्या वर्षाच्या अनुभवाने अगदी तरबेज झाली होती. हां हां म्हणता पाच-पंचवीस जणांनी सामान उचलले. काही गाड्यांवर लादले, काही आम्ही हातात घेतले व बंगल्याच्या वाटेने वाळू तुडवीत चालू लागलो.
 उत्तर गुजरात म्हणजे एक वाळूचा समुद्रच आहेजेथे माणसांचा पायरव फारसा नाही अशा जागी थोडेसे वाळलेले गवत व त्याच्या मुळ्या ह्यामुळे वाळू जरा तरी चिकटून कठीण झालेली असते. पण माणसांच्या पायाखालची वाट आली म्हणजे घोट्यापर्यंत पाय भुसभुशीत वाळूत रूततात. महाराष्ट्रातील कठीण काळी माती किंवा डोंगरांवरील कोळे कातळे ह्यांवर चालायला सरावलेले आमचे पाय ह्या बाळूत चालायला अगदी नाखुष असायचे. पायाखाली मुळी 'स्थिर जमीन लागायचीच नाही. दर पाऊल वायूत बुडालेले वर काढून परत टाकायचे. वहाण पायात असली तर पाऊल वर उचलल्याबरोबर वाळूचे ओथळ खाली वाहायला लागायचे आणि बूट असला तरं दरवेळी बुटात वाळू जमायची थोडा वेळ झाला की, आपला जडजड व्हायचा; नाहीतर बूट काढावा तो आतल्या बाजूने घासून घोट्याची साल गेलेली असायची अर्थात काही दिवसांनी हेही अंगवळणी पडत असे. आणि ह्या वाळूला तर आम्ही रोज शतशः धन्यवाद देत होतो, कारण हिंच्याच मायेच्या पांघरुणाखाली जतन झालेली दहा-पंधरा हजार वर्षांपूर्वीच्या मानवांन संस्कृती आम्हाला गेल्या वर्षी सापडली होती. गेल्या वर्षी दगडाची हत्यारे, खाऊन टाकलेल्या प्राण्यांची हाडे व दात अशा कितीतरी वस्तू आम्हाला मिळाल्या होत्या, व यंदा त्या काळातील माणसेही ह्या वाळूखाली पुरलेली आढळतील ह्या आशेने भोठी सामग्री घेऊन आलो होतो!
 आम्ही बंगल्यावर पोचल्यावर सामानाची लावालाब केली. टिकाव व फावड्याचे दांडे बसवून टिकवांना धार लावण्यासाठी सुतार व लोहारांना बोलावले दुसर्या दिवशी सकाळी खणयला कोण पुरुष येणार,मातीची घमेली टाकायला कोणं पोरी येणारं, वाळूतून सांस्कृतिक अवशेष निवडून काढायला कोणं येणार, वगैरेंची विचारपूस यादी केली. आमच्या कामाचे साहित्य बाहेर काढले. प्रत्येकाने खोलीचा एक-एक कोपरा धरून आपली महिनाभर राहावयाची निजायची जागा मुक़र केली. एकेला खोलींत चार चारजण (एकेका कोपऱ्यात एक एकजण) होतो. इतके होते तो