पान:Paripurti.pdf/137

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


परिपूर्ती / १५१
 

सारखी रडत होती. "बाई, काय झालं? काही दुखतं का?" "मले नव्हे हो, पोराले!" ती म्हणाली. ती बाई बीडची. महिनाभर प्रवास चालला होता. दोन दिवस झाले, ते वर्षाचे मल तापाने फणफणले होते. उन्हापावसात, वाऱ्यात चालायचे- मूल सारखे पाठीशी. त्याला बाधले तर नवल काय? "एवढ्या लहान मुलाला घेऊन कशा निघाला?" "अहो काय सागू? शेजारच्या चार-पाच गावची माणसं निघाली. शेजारणी म्हणाल्या, 'तुझा सारा जीव संसारात. नाही तरी घरी राहन पोरं काय मरायची थांबली आहेत? चल, पांडुरंगाच्या पायाशी चल, चालवतं आहे तोवर.' म्हणून आले. पण आज दोन दिवस पोर डोळा उघडीत नाही हो!" बारीबरोबर सरकारी डॉक्टर व दवाखान्याची मोटार होती ती दाखवून तिला म्हटले, “जा तिकडे, तुला फुकट औषध मिळेल." ती रोज दूध घेऊन मुलाला द्यायची. ते उकळून घे म्हणून काय सांगणार? मी म्हटले, "मुलाला दुधाचा 'चा' ऊन ऊन दे; घाम यऊन ताप जाईल. विठ्ठल तुला नाही अंतर देणार." ती बरोबरच्या माणसांना घेऊन दवाखान्याकडे गेली. पलीकडे एक म्हातारा पागोटे उशाशी पऊन पडला होता. तो उठून बसला व मला म्हणाला, "ही कसली वारी करते? पोराला ताप आला की, लागली रडायला. देव ठेवील तस राह्यला पाहिजे." मला ह्या शिष्टपणाचा राग आला. मी जरा रागानेच उत्तरले, "तुम्हाला काय जातं बोलायला? ज्याचं दु:ख त्याला ठाऊक." म्हातारा म्हणतो, “अहो, तो विठ्ठल मोठा कठीण देव हाये बरं! तुमचं मन दुसरीकडे गुतलं तर तो सोडवून टाकतो. मीच पाहा ना! बायको होती, मुलं होती, घर हात. एका साथीत चार दिवसात सगळी खलास. घर टाकलं विकून. पैसे टाकले संपवून. आता म्हणतो, देवा तुझ्याशिवाय कोणी नाही!" त्याच्या हातावर चहासाठी पैसे टाकून दिंडी जवळ आली म्हणून मी उठले. “देवा, उषा मनात मला 'चा' द्यावा असं आलं रे! पांडुरंगा नारायणा! हे शब्द ऐकू आले.
 अशीच एक म्हातारी आजीबाई अधनमधून दिसायची. एकदा तिला कोणी विचारले, “आजीबाई. तुमची मुलं, नातवंडं काय करतात, कुठ असतात?" म्हातारीने प्रश्न ऐकला मात्र, तिचे डोळे मिटले. तोड भेसूर दिसू लागले व ती आपादमस्तक थरथर कापू लागला. तिचे डोके लटलट हालू लागले व ती शरीर घुसळ लागली. आम्ही घाबरलो व झटदिशी तिच्याजवळ जाऊन तिला बिलगन तिच्या अंगाभोवती हात टाकले. “आजीबाई, सावध