पान:Paripurti.pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
परिपूर्ती / १५
 




वेड लागलेले घर

'अयाई ग!" लगेच नंतर मोठ्याने

भोकाड पसरल्याचा आवाज आला. मी धावतच
गेले. पाहते तो धाकटीला गुडघ्याला लागले होते
आणि ती कळवळून रडत होती. “काय ग? कुठं
लागलं? काय झालं?" “अगं, अशी धावता धावता
खुर्चीवर आपटले!" ‘‘कार्टे, डोळे उघडे
ठेवून चालायला काय झालं होतं? चल वर,
औषध लावते. गुडघ्याला औषध लावण्यापेक्षा
डोळ्यातच औषध घातलं पाहिजे तुमच्या? रोज
दहादा धडपडता- काय दारं अरुंद आहेत, का
घरात अंधार आहे, म्हणून अशी चालता देव
जाणे! माझ्या तोंडाचा पट्टा रोजच्यापेक्षा जोरात
चालला होता. मी चांगलीच कावले होते. गेल्या
दोन तासांत तिघांनी धडपडून लागून घेतले होते.
औषध लावून गौरीचा गुडघा बांधला आणि
तिला बजावले की, “आता अशी आधळ्यानं
चाललीस, तर बघ चांगली सडकून काढीन
औषध वगैरे काही नाही!"
 त्या दिवशी कुणाला आणखी लागले
नाही. दुस-या दिवशी धाकटीचा परकर शिवीत
बसले होते तो अंगणातून “बघ ग काय जम्मत

आहे ती!" अशी आरोळी आली व त्यापाठोपाठ